माहे फेब्रुवारी 2023 चे निवृत्तीवेतन 6 मार्च नंतर 

नागपूर :- राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना वरिष्ठ कोषगार कार्यालय नागपूर अंतर्गत माहे फेब्रुवारी 2023 चे निवृत्तीवेतन 6 मार्च नंतर अदा करण्यात येईल असे अप्पर कोषगार अधिकारी सतिश गोसावी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

आयकर प्राप्त निवृत्तीवेतन धारकांची आयकराची परिगणना पुन:श्च सुधारीत करून आयकराचा अंतिम हप्ता फेब्रुवारी 2023 च्या निवृत्तीवेतनातून कपात करण्यात येणार आहे, ते वेतन प्रणालीमध्ये समाविष्ठ करून अंतिम करण्याची कार्यवाही कोषागार स्तरावर सुरू आहे. तसेच दिनांक 4 व 5 मार्च 2023 रोजी शासकीय सुट्टी असल्याने निवृत्तीवेतन प्रदान हे 6 मार्च नंतर संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल याची सर्व निवृत्तीवेतन आणि कुटूंबवेतन धारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वरिष्ठ कोषगार अधिकारी नागपूर यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘जी-20’मध्ये नागरी समाज संस्थांची भूमिका

Tue Feb 28 , 2023
जागतिक आर्थिक धोरण आखतांना नागरिकांच्या अपेक्षा प्रतिबिंबीत करण्याची महत्वपूर्ण भूमिका सिव्हिल सोसायटी ऑर्गनाजेशन्स अर्थात नागरी समाज संस्था (सी-20) ‘जी-20’ समुहामध्ये पार पाडते. हा गट आर्थिक हितसंबंध आणि नागरिकांचे हित यांच्यात संतुलन राखण्यात मदत करतो. त्याअनुषंगाने नागपूर येथे येत्या 21 व 22 मार्च रोजी आयोजित या सिव्हील-20 गटाच्या प्रारंभिक परिषदेला विशेष महत्व आहे. नागरी समाज या संकल्पनेनुसार देशातील प्रत्येक व्यक्ती नागरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com