अवैधरीत्या कत्तल करण्यासाठी गोवंश घेऊन जाणारी गाड़ी पोलिसांच्या ताब्यात, 5 जनावरांची सुटका

– दिनेश दमाहे

नागपुर – आज दि. 23/2/2022 रोजी पो.हवा राजेंद्र रेवतकर नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांना मुखबिर व्दारे खबर मिळाली कि, सिंदेवाही, बडेगाव, रोड ने खापा मार्ग पांढÚया रंगाची महीन्द्रा कंपनीची जेनिओ झेनॉन गाडी व गाडीच्या डाल्यावर पिवळया रंगाची ताळपतरी झाकलेले वाहनात कत्लीकरीता गौवंशाची वाहतुक केली जात आहे. ते वाहन खापा मार्ग नागपुर च्या दिशेने जाणार आहे. अशी  खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पो.स्टे खापा येथील पोलीस स्टाफ मिळुन बडेगाव ते खापा येणाऱ्या रोड वर नाकाबंदी लावुन वाहन चेक करीत असतांना दि. 23/02/2022 चे सकाळी 07.00 वा. दरम्यान पांढऱ्या रंगाची महीन्द्रा कंपनीची जेनिओ झेनॉन गाडी क्र.एम.एच 02 सी.ई. 0759 येतांना दिसली. त्या वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला असता चालकाने आपले ताब्यातील महीन्द्रा कंपनीची झेनॉन गाडी क्र.एम.एच 02 सी.ई. 0759 गाडी नाकाबंदीच्या ठिकाणी न थांबवीता ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन रोडवरील वाहतुकीस व लोकांना धोका निर्माण होईल अष्या स्थितीत वाहन चालवित खापा रोड ने सावनेर च्या दिशेने पळुन जात असतांना त्यांचा पाठलाग केला असता सदरची गाडी चालकाने कोदेगाव ते तिघई मार्गाने पळुन गेला. तिघई गावाजवळील रोड वर एक ट्रक्टर रोड वर शेनखत भरण्या करीता रोडवर आडवे उभी असल्याणे व गाडी जाण्यास जागा नसल्याने महीन्द्रा कंपनीची जेनिओ झेनॉन गाडी चा चालकाने आपले वाहन रोड च्या कडेला उभी करुन शेतातील झाडीझुडपीचा फायदा घेउन पळुन गेला. शोधा घेतला दिसुन आला नाही. करीता महीन्द्रा कंपनीची जेनिओ झेनॉन गाडी ची पाहणी केली असता सदर गाडीचा क्रमांक गाडी क्र.एम.एच 02 सी.ई. 0759 दिसुन आले. तसेच गाडीवर पिवळया रंगाची प्लास्टिक ताळपतरी झाकुन दिसुन आली. ताळपतरी काढुण पाहीले असत गाडीच्या डाल्यात 08 नग गौवंश जनावरे अत्यंत क्रंुर व निर्दयतेने डांबुन त्याचे चारही पाय व तोड नायलॉन रस्सी ने बांधुन त्यांनी चारापाणी न देता कोबुुन दाटी वाटीने अपु-या जागेत कोंडुन दिसुन आले. त्यापैकी 02 गाय व 01 गोरे मृत अवस्थेत दिसुन आले व 02 गाय व 03 बैल असे एकुण 05 नग गौवंश जिवंत दिसुन आले. करीता सदर जनावरांची वाहतुक ही कत्ली करीता होत असल्याची खात्री झाल्याने गौवंश जनावरे वाहनासह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मालाचे वर्णन 05 नग (बैल, गाय) गोवंश एकुण 75,000/-रु. व 03 नग मृत असलेले गाय व गोरे तसेच महीन्द्रा कंपनीची जेनिओ झेनॉन कपंनीची गाडी क्र.एम.एच 02 सी. ई. 0759 कि. 2,50,000/-रु. असा एकुण कि. 03,25,000/-रु. चा माल मिळुन आला. फिर्यादी चे रिपोर्ट वरून आरोपी चालक व वाहन मालक विरूध्द पोलीस स्टेषन खापा येथे अप क्र. 49/2022 कलम 279,429,34,भा.द.वि. सहकलम 11(1)(जी)(डि)(सी) प्राण्यांणा निर्दयतेणे वागणुक प्रतिबंध अधिनियम 1960 सहकलम 5(अ)(1)(2),9 महाराष्ट्र प्राणि सरक्षंण अधिनियम 1965 सहकलम 119 महाराष्ट्र पोलीस अधि. सहकलम 192(अ),179,184 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक  विजयकुमार मगर नागपुर जिल्हा  ग्रामिण, अपर पोलीस अधिक्षक  राहुल माकणीकर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार राजेंद्र रेवतकर, नापोशि आशिष मुंगळे, नापोशि उमेश फुलबेल, नापोशि किषोर वानखेडे सर्व नेमणुक स्थागुशा नाग्रा तसेच पोलिस हवालदार अशोकसिंग ठाकुर, नापोशि संजय वानखेड, चा.पो.हवा.पाचपील्ले पो.स्टे खापा या पथकाने पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com