अवैधरित्या सुगंधीत तंबाखू बाळगणा-यावर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेनी केली ०२ आरोपींवर कारवाई एकूण २,८८,८२० रु चा मुद्देमाल जप्त

नागपूर :-दिनांक २५,०७,२०२३ रोजी उमरेड उपविभागातील पोलीस स्टेशन भिवापुर हद्दीत अवैध धंद्यावर रेड करणे कामी फिरत असता गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, यातील नमुद आरोपी नामे १) नरसिंग वचनप्रसाद गुप्ता वय ५३ वर्षे २) फरार आरोपी / राजु उर्फ राजकुमार यवनप्रसाद गुप्ता वय ४६ वर्ष दोन्ही रा. शिवाजी लेआउट भिवापुर यानी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित सुंगधीत गुटखा चा साठा आपल्या घरी दुकानात साठवुन ठेवलेले आहे. अश्या माहीतीवरून नमुद ठिकाणी येथे आरोपींच्या घरी जाउन रेड केली असता, खालीलप्रमाणे माल मिळुन आला.

१. १०८ ईगल चे ४६ नग कि ४३०१०/-

२. होला कंपनीचे सुगंधी तंबाखु ३३० नग एकुण कि ५४१२०/- ३. ईगल कंपनीचे सुंगधीत तंबाखु २७९ नग कि १७८५६०/-

४. विराट कंपनीचे सुंगधीत तंबाखु २९ नग कि ७२५०/-

५. पान पराग कंपनीचे ४९ नग एकुण ५८८०/- असा एकुण २,८८,८२०/- चा मुद्देमाल.

आरोपी नामे १) नरसिंग वचनप्रसाद गुप्ता वय ५३ वर्षे

२) फरार राजु उर्फ राजकुमार बबनप्रसाद गुप्ता वय ४६ वर्ष दोन्ही रा. शिवाजी लेआउट भिवापुर नमुद आरोपीतांवर पोस्टे भिवापुर येथे कलम १८८.२७२, २७३,३२८ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करून जप्त माल व आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करीता पोस्टे भिवापुर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई विशाल आनंद (पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण), संदीप पखाले अपर पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने प्रभारी ठाणेदार तथा पोलीस उपअधिक्षक राहुल झालटे पोस्टे भिवापुर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, तसेच स्टॉफ पो हवा अरविंद भगत, मिलींद नांदुरकर, मयुर ढेकले, पोलीस नाईक रोहन डाखोरे अमृत किंगे पोशि राकेश तालेवर यांचे पथकाने केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोस्टे नरखेड येथील खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा कडुन उघड, २ फरार आरोपीना केली अटक

Thu Jul 27 , 2023
नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत येणा-या मोवाड येथे नगर परीषद कॉम्प्लेक्स जवळ आठवडी बाजार येथे मंजुषा आमटे या महीलेला कोणीतरी अज्ञात इसमाने जिवानीशी ठार मारून तिला बाजुला असलेल्या नालीचे चैवरमध्ये टाकले. यावरून दिनांक १८/७/२०२३ रोजी पोलीस स्टेशन नरखेड येथे अपराध क २९५/२३ कलम ३०२,२०१ भादवि अंतर्गत दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गुप्त माहितीच्या आधारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com