नागपूर :- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर अनेक वेळा आक्रमक झाले होते. अनेक आंदोलने त्यांनी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी केलेले आहे. मागील २५ वर्षीच्या या अविरत संघर्षांला शेवटी न्याय मिळाला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय दिला व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याचे निर्देश दिले. यामुळे समस्त महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा आनंद प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर व प्रहार अपंग क्रांती मोर्चा तर्फे संविधान चौक येथे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा ढोलच्या गजरात व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. जल्लोष कार्यक्रम प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष राजेश बोढारे व कार्याध्यक्षा शबिना शेख यांचे नेतृत्वात घेण्यात आला.
यावेळी आपल्या वक्तव्यात राजेश बोढारे यांनी सांगितले की मागील अनेक वर्षांपासून होत असलेल्या दिव्यांग बांधवांच्या मागणीला माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी घेतलेल्या परिश्रमाला शेवटी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दाद दिली व स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बच्चू कडू यांचे आभार मानले व येत्या काळात स्वतंत्र मंत्रालयामुळे दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्यांचे निराकरण होणार असल्याचे वक्तव्य राजेश बोढारे यांनी केले.
यावेळी प्रमुख रूपाने कार्य अध्यक्ष शबीना शेख, शहर सचिव नकुल गमे, अरमान खान, पश्चिम नागपुर अध्यक्ष अमोल इसपांडे, कार्यअध्यक्ष प्रवीण हाथमोड़े, पश्चिम उपाध्यक्षा कविशर राऊत, उमेश गणवीर,ज्योति बोरकर,धर्म पटवार,सुनील ठाकुर, सलाम भाई, शुभम उघडे, विक्की रीढोरकर शुभम धोसेवान, मुनी ताई. बालू मांडवकर,शाहु साहाब, रिजवान, देविदास मेश्राम, पदाधिकारी व अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.