गोंदिया :- येथील प्रभाग क्रमांक सहा, गांधी वार्ड इथे कामगार मोर्चा भाजप गोंदिया जिल्हा व्दारा २६ नोव्हेंबर ला सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा *मन की बात* कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित माजी नगरसेविका भावना कदम, माजी नगरसेविका सुनिता तरोणे, पुर्व विदर्भ कामगार मोर्चा चे अध्यक्ष धनंजय वैद्य, सहकार आघाडी चे अध्यक्ष दिपक कदम, का. मो. जिल्हा सचिव अंकुश वैद्य सह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान दिनाच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन संविधानाचे पुजन करण्यात आले. सायंकाळी लहान मुलांनी संविधान या विषयावर भाषण केले आणि सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम गणवीर, संदिप डोंगरे, क्षितीज वैद्य, विशाल बन्सोड, प्रदिप डोंगरे, जावेद पठाण यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रशांत डोंगरे यांनी केले.