राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

मुंबई :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

female tiger cub was knocked dead by a train

Wed Nov 29 , 2023
Nagbhid :- A 4 month old female tiger cub was knocked dead by a train on Gondia-Chanda Fort route in Nagbhid Range of Bramhapuri forest division, Chandrapur on early morning of Nov 27. Pug marks of other cubs, tigress found at a water body nearby. This is one of the many deaths of wild animals including the tigers due to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com