खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक १७.०५.२०२३ चे १५.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे बेलतरोडी प्लॉट नं. २७, कुल सोसायटी, महारूद्ध नगर येथे राहणारा फिर्यादी सुचित गुलाब राहंगडाले वय २६ वर्ष घरी असतांना शेजारचे वस्तीत राहणारा आरोपी सन्नी संतराम गायकवाड वय २० वर्ष रा. श्याम नगर सोसायटी, कैकाडी नगर, बेलतरोडी याने फिर्यादीस आवाज देवुन बोलाविले व त्यास “तु वस्ती मध्ये पानठेला कसा सुरू केला” या वरून अश्लिल शिवीगाळ करून आरोपीने त्याचे जवळील लोखंडी बंदुकी सारखे अग्नीशस्त्र काढून धाक दाखवून ‘तु पानठेला लावायचा नाहिस सुरू ठेवायचा असेल तर दर महिन्याला २,०००/- रू खंडणी दयावी लागेल” व न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे बेलतरोडी येथे पोउपनि गिरी यांनी आरोपी विरुद्ध कलम ३८५ २९४, ५०६ भादवि सहकलम ३/२५ मा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

Thu May 18 , 2023
नागपूर :-दिनांक १७.०५.२०२३ से १८.०० ते १८.३० वा. ने सुमारास पोलीस ठाणे अजनी हदीत तुकडोजी पुतळा ते किडा चौक दरम्यान, मेडीकल चौकाकडे जाणाऱ्या टर्निंगवर, भाग्यलक्ष्मी चपल दुकाना समोरून फिर्यादीची मुलगी अश्लेषा सुनिल टेंबरे वर्ष २० वर्ष रा. चंद्रमणी नगर गल्ली न. ३ अजनी, नागपूर ही तिथे मोपेड गाडी क्र. एम. एच. ३२ ए.बी ०३४३ वर मागे डबलसिट आई वर्षा वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com