कामठी तालुक्यातील ‘आरटीई’शाळेच्या नोंदणी प्रक्रियेत 41 शाळांचा समावेश

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– तालुक्यातील 456 विद्यार्थ्यांना 41 शाळेत मिळणार मोफत प्रवेश

कामठी :- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत तालुक्यातील खाजगी शाळांमध्ये व त्याचप्रमाणे कामठी पंचायत समिती अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया झाली.त्यानुसार कामठी तालुक्यातील 41 शाळांमध्ये 456 विद्यार्थ्यांना ‘आरटीई ‘ अंतर्गत प्रवेश मिळणार आहे.लवकरच पालकांना अर्ज करता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे सव्वालाखे यांनी दिली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश करण्याची या माध्यमातून संधी प्राप्त होत असते त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेची पालक प्रतीक्षा करीत आहेत.यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांची नोंदणी करण्याची जवाबदारी संबंधित शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

आरटीई अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील मुलांना खासगी शाळांमध्ये निशुल्क प्रवेश मिळणार या हेतूने पालकात उत्साहाचे वातावरण असून ही प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होते या प्रतीक्षेत पालकवर्ग डोळेटक बसले आहेत.

 -प्रवेशासाठी लागणार ही कागदपत्रे

– रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी ,आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडे करार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची प्रत आवश्यक आहे.जन्मतारखेचा पुरावा,उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी स्लिप, तहसीलदाराचा दाखला,कंपनीचा दाखला,जात प्रमाणपत्र पुरावा,दिव्यांग मुलासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकिय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र असावे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोरवाल महाविद्यालयात युथ कार्निवलचे उद्घाटन थाटात संपन्न

Wed Feb 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे युथ कार्निवल अर्थात सांस्कृतिक व अभ्यासपूरक कार्यक्रमाचे  दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ. रविंद्र हरदास, प्राचार्य फाईन आर्ट महाविद्यालय एम. पी. देव नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण हे विचारपीठावर उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com