मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली

मुंबई :- रसिकांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी…” या सदाबहार गझलच्या माध्यमातून पंकजजींनी रसिकांच्या मनांचा ठाव घेत, गझल गायनाच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले. गझलांमधील तरल भावनांना सुरेल आवाज देणारा हा कलावंत तितकाच विनम्र होता. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय गझल गायकीला घरा-घरात आणि मना-मनात पोहचवणारा आवाज शांत झाला आहे. ते स्वररुपात अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकले आहे, असे शोकसंदेशात नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार

Tue Feb 27 , 2024
Ø महिलांना ये-जा करण्यासाठी एसटी बसेस Ø बसमध्ये खाद्य पदार्थांची सुविधा Ø स्वच्छतागृहांसह प्रत्येक कक्षात पिण्याचे पाणी Ø औषधांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती Ø कार्यक्रमस्थळ व पार्किंगमध्ये 9 ॲम्बुलन्स यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पुर्णत्वास आली आहे. कार्यक्रमास महिलांसह तीन लाखापेक्षा जास्त उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights