सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 88 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (24) रोजी शोध पथकाने 88 प्रकरणांची नोंद करून 97200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8800 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु 1600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामांकरीता बंद करणेबाबत एकूण 12 प्रकरणांची नोंद करून रु 14000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.चिकन सेंटर मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वै्द्यकिय व्यवसायिकांनी जैव वैद्यकिय कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 15000 दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविले अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 26 प्रकरणांची नोंद करून रु 5200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून रु 13000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

पुण्य स्मृति - पुज्य भदन्त बोधिविनीत महाथेरो

Wed May 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – बोधिमग्गो महाविहार, इसासनी-भीमनगर येथे संपन्न…  नागपूर :- असंख्य तरुण भिक्खूंचा त्याग, जिज्ञासा, चिकित्सकवृत्ती, अनुशासनबद्धता, धेय्य प्राप्ति चा दृढ निश्चय , परिवर्तनासाठी विद्रोही भुमिका, प्रवाहाच्या विरूद्ध लढण्यास सज्ज, लढवय्या योद्ध्याची उर्जा ही आचरणात आणल्यामुळे नष्टप्राय झालेल्या इतिहासाला पुर्ण स्थाई करता आले. वर्तमान विषम काळात समाजातील लोकांनी पुर्वोत्तर समाजभूषण, कर्तबगार आदर्श व्यक्तीमत्वाच्या श्रम, त्याग, कर्तुत्वाचा सन्मान राखला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com