नागपूर – प्रभाग क्रमांक ३९ (नवीन प्रभाग) आझाद हिंद नगर येथील नाल्याची भींत मागील तीन ते चार वर्षांपासून पडलेली आहे तरी सुद्धा त्या प्रभागातील माजी नगरसेवक हे दुर्लक्ष करीत होते . मागील अनेक वर्षापासून येथे राहणारे नागरिक नियमितपणे नगरपालिकेला कर सुद्धा भरतात. परंतु त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रस्त्याला लागून असलेली नाल्याची भींत पडल्या मुळे रस्त्यावरून ये-जा करतांना अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहेत.विशेषकरून पावसाळ्यात तर नागरिकांचे हाल होतात. त्यासोबतच पिण्याचे शुद्ध पाणी सुद्धा नागरिकांना मिळत नाही.
नगरपरिषदेकडून नालीचे, रस्त्याचे व इतर बाबींचे मोजमाप करून अनेक महिने लोटले तरीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच वारंवार प्रभागातील नगरसेवक या समस्ये ला दुर्लक्ष करीत असल्याने तेथील स्थानिक नागरिकांनी कंटाळून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव केतन ठाकरे यांच्या कडे या समस्ये ची तक्रार केली . नागरिकांनी केलेली तक्रराची दाखल घेवून लगेच केतन ठाकरे यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन बोलावले आणी तुटलेल्या नाल्यांच्या भींतीची पाहाणी केली व मनपा कर्मचाऱ्यांना नाल्याची भींत त्वरित दुरुस्ती करण्याचे व गार्डनची सफाई करून नागरिकांना होत असलेल्या समस्याचे तात्काळ निपटारा करण्याचे चेतावणी दिले आहे या प्रसंगी परीसरातील नागरिक उपस्थित होते.