संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येणाऱ्या परिसरात एक 10 वर्षीय आयुष नामक बालक बेवारस अवस्थेत आढळल्याची घटना 19 एप्रिलला घडली असता या बालकाच्या घराचा शोध लावणे पोलिसांना एक आव्हानच होते दरम्यान या मुलाला पोलिसांनी बाल सदन अनाथलयात देखरेखीत ठेवले असता आज 21 एप्रिल ला एक 60 वर्षीय महिला सदर वर्णनाच्या मुलाची मिसिंग ची तक्रार नोंदविण्यास आली असता पोलिसांनी त्वरित या महिलेला सदर मुलाशी भेट घालून दिली ज्यात दोघेही एकाच घरचे सदस्य असून आजी नातू असलेले नातेवाईक निष्पन्न झाले पोलिसांनी त्वरित त्या मुलाला आजीबाईच्या स्वाधीन केले.
मुलाला सुपूर्द करण्यात आलेल्या आजीबाईचे नाव देवकाबाई हिंगे वय 60 वर्षे रा कामगार नगर कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व सहकारी कर्मचाऱ्यांनी केले.