सायक्लोथॉनच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह स्वच्छतेचा जागर

स्मार्ट सिटीच्या अभिनव ‘फ्रीडम टू वॉक, सायकल अँड रन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा जागर करीत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित सायक्लोथॉनला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. सकाळी ६.३० वाजता नागरिकांनी सायकल रॅलीत भाग घेऊन पर्यावरणचा संरक्षण आणि नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ करण्याचा निर्धार केला. या रॅली मध्ये नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सिटी लीडर अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त आणि सिटी लीडर राम जोशी, आंतरराष्ट्रीय सायकलपटू आणि बायसिकल मेयर डॉ अमित समर्थ, माजी स्थायी समिती सभापती आणि सिटी लीडर  विजय झलके प्रामुख्याने उपस्थित होते.

ज्येष्ठ सायकलपटूंनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. नागपूर महानगरपालिकेच्या नेताजी नगर प्राथामिक शाळेचे विद्यार्थी, उपद्रव शोध पथकाचे जवान, अग्निशमन विभागाचे जवानासोबत विविध सायकलिस्ट ग्रुप रॅलीत सहभागी झाले होते. सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखणे तसेच वातावरणात कॉर्बन उत्सर्जन कमी करणे आणि नॉन मोटराईज ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देणे हा होता. स्मार्ट सिटी मिशन, केन्द्र शासनाचे गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या निर्देशाप्रमाणे ‘फ्रीडम टू वॉक, सायकल अँड रन’ अंतर्गत सायक्लोथॉन कार्यक्रमाचे आयोजन फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन येथून करण्यात आले होते. या उपक्रमाचे सिटी लीडर्समध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, माजी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांचा समावेश आहे.

या प्रसंगी नागरिकांना संबोधित करतांना अजय गुल्हाने यांनी सांगितले की, सायक्लोथॉनचा उद्देश नागरिकांना स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर, स्वस्थ नागपूरसाठी प्रोत्साहित करणे तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकलचा वापर करणे आहे. त्यांनी छोट्या अंतरासाठी दुचाकी वाहना ऐवजी पायी चालणे किंवा सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी” च्या निर्देशाप्रमाणे पायी चालणाऱ्या नागरिकांचा रस्त्यावर पहिला अधिकार आहे. यासाठी नागपूर स्मार्ट सिटी तर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. पायी चालण्यामुळे आणि सायकल मुळे शहरात प्रदुषणाचा स्तर कमी होईल. 

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता रँकिंग मध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे पाऊल उचलले जात आहेत. नागपूर @२०२५ आणि अन्य स्वयंसेवी संस्थांसोबत स्वच्छ मोहल्ला स्पर्धा सुरु आहे. यामध्ये ५०० मोहल्ल्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी नागपूरकरांना निरोगी राहण्यासाठी सायकल चालविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, यामुळे नागपूर मध्ये प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे संयोजन आणि संचालन रवींद्र परांजपे यांनी केले.

फ्रीडम टू वॉक, सायकल अँड रन’ अंतर्गत सायक्लोथॉनची फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन पासून सुरुवात झाली आणि विज्ञान संस्था, आकाशवाणी चौक, तिरपुडे कॉलेज, CSIR – CIMFR, सी पी क्लब, लेडीज क्लब, आकाशवाणी चौक, विज्ञान संस्था अशी मार्गक्रमण करून फ्रीडम पार्कवर परतली. या सायक्लोथॉनमध्ये नागरिकांनी ९ किलोमीटर अंतर पार केले.

रॅली मध्ये टायगर सिटी सायलिंग क्लब, माइल्स अँड माइर्ल्स, लाफ्टर अँड रनर चे सायकलपटू सहभागी झाले होते. यावेळी रवींद्र परांजपे, दिलीप वरखेडे, नरुल हक, जितेश गोपवानी, अतुल कडू, अर्चना बोनगिरवर, नयना ठक्कर, तरुण श्रीवास्तव तसेच मनपाचे अधिकारी महेश धामेचा, प्रकाश वराडे, राजेंद्र उचके , डॉ नरेंद्र बहिरवार, गजेंद्र महल्ले, राजेंद्र पुसेकर, नागपूर स्मार्ट सिटीचे सिटी लीडर भानुप्रिया ठाकूर, राजेश दुफारे, सिटी लीडर डॉ प्रणिता उमरेडकर, डॉ शील घुले, राहुल पांडे, मनीष सोनी, अमित शिरपूरकर, डॉ पराग अरमल आणि इतर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Sony India ने भविष्य के फिल्म निर्माताओं के लिए नए 4K Super 35 कैमरा FX30 के साथ सिनेमा लाइन का विस्तार किया

Thu Feb 16 , 2023
FX30 सिनेमा लाइन कैमरा हर अभिनय में उच्चस्तरीय सिनेमाई प्रकाशन को कैपचर करें क्रिएटर्स की ज़रूरतों को पूरा करने के लिए AF परफ़ॉर्मेंस को बेहतर बनायें प्रभावी पोस्ट-प्रोडक्शन वर्कफ्लो सपोर्ट का अनुभव करें लचीले संचालन के साथ कॉम्पैक्ट और अद्वितीय रूप कारक अधिक स्टोरेज के लिए अत्यधिक एक्सपैंडेबल मेमोरी हर शूट के लिए ठोस विश्वसनीयता नई दिल्ली : Sony India को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com