दुहेरी हत्याकांडाचे अखेर गुढ 24 तासाच्या आत उकलले

स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई

दोन भावांनीच केली हत्या, चौघांना अटक

नागपुर –  बुटीबोरी शिवरातील वेणा नदीच्या पुलाखाली मिळून आलेल्या बेवारस दुहेरी हत्याकांडाचे गुढ 24 तासाचे आत उकलले आहे . गुरुवारी दुपारी नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुई-खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात अनोळखी एका महिलेसह पुरुषाच्या मृतदेह हातपाय मोठ्या दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले होता .

या दुहेरी हत्याकांडाची माहिती नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने घटनास्थळी येवून भेट दिली. घटनास्थळी मिळून आलेल्या मृतदेहाची पहाणी केली असता पुरुष इसम हा अंदाजे 30 वयोगटातील असून त्यांचे अंगात लाल, पांढऱ्या निळया, काळया, पिवळया रंगाचे आडवे पट्टे असलेला टिशर्ट व गड्द निळया रंगाची जिन्स् पॅन्ट तसेच महिला हि 35 वयोगटातील असून तिच्या अंगात लाल, पांढऱ्या निळया, काळया, पिवळया रंगाचे चौकडा असलेली साडी, तपकीरी रंगाचे ब्लाउज, काळया रंगाचा पेटीकोट परिधान केल्याचे दिसून आले.

दोन्ही मृतशय क्रुर व निर्दयतेने दोघांची हत्या केल्याची बाब समोर आली. पो.स्टे. बुटीबोरी व स्थागुशाचे वेगवेगळे 5 पथक तयार केले व पथकाने वेगवेगळया मार्गाने तपास सुरु केला. घटनेच्या काही अंतरावरील सि.सि.टी.व्ही. फुटेज तपासले, आसपासचे भागात खबऱ्यांकडे दोन्ही मृतकांचे फोटो प्रसारीत केले. यातुनच खात्रीशिर माहिती प्राप्त झाली की, दोन्ही मृतक कारंजा घाडगे येथील बिहाडी गावात रहात होते. बिहाडी गावात जावून याबाबत अधिक शहानिशा केली असता मृतकांची ओळख पटली यातील मृतक पुरुषाचे नाव उत्तम सुरेश बोडखे वय 31 वर्ष रा. बिहाडी, कारंजा घाडगे असून मृतक महिलचे नाव सविता गोवर्धन परमार वय 38 वर्ष रा. सोनेगाव मुस्तफा असल्याची माहिती समोर आली.

अधिक तपास केले असता उत्तम याचे लग्न झाले असून लग्नाचे काही दिवसामध्ये पत्नीला सोडून नागपूर येथे निघून गेला. तो नागपूरला कुठे रहातो याबाबत माहिती नव्हती. दोन्ही मृतक हे बांधकाम मजूरी करीत होते ते दोघेही हिंगणा येथील भिमनगर झोपडपट्टी इसासनी हिंगणा रोड येथे रहात असल्याचेी माहिती समजली. त्यावर पोलीसांनी भिमनगर झोपडपट्टी येथे जावून मृतक रहात असलेल्या घरमालकांकडे चौकशी केली असता माहिती मिळाली की, उत्तम बोडखे याचा एक भाऊ दारु पिण्याचे सवयीचा असून कोणतेही कामधंदा करीत नाही. दुसरा भाऊ शेती व्यवसाय करतो. मृतकाचे नावे असलेल्या शेतीचा विवाद भावांमध्ये सुरु असून दि. 06/07/2022 रोजी उत्तम बोडके आणि सविता यांना उत्तमचे भावांनी बिहाडी गावात वाद विवाद मिटविण्याकरीता बोलाविले होते. त्यामुळे ते दोघे मोटरसायकलने नागपूर वरुन बिहाडी गावाकडे गेले आहे.

सदर गुन्हयामध्ये संषयीत राहुल बोडखे मयाताचा सख्खा भाउ असून त्याचेवर संषय बळावला. व अधिक तपासात त्याचा दुसरा सख्खा भाऊ खुशाल सुरेश बोडखे वय 29 वर्ष हा सुध्दा असल्याचे निष्पन्न झाला. त्यांचे सोबत विजय व आकाश हे सुध्दा सहभागी आहेत. त्यांना सुध्दा ताब्यात घेतले. सविता ही उत्तम याचे शेतात मजूरी करीत होती त्या दोघांमध्ये प्रेमसंबध जुळले व दोघेही 2 वर्षापुर्वी बिहाडी गाव सोडून गेले. सविता हीचे पुर्वीच लग्न झाले होते परंतु ती उत्तम सोबत पळून गेली. उत्तमचे दोन्ही भावानी त्याला समजावून सविता पासून दुर रहाण्याचे सांगीतले होते, परंतु उत्तम हा स्वतःच्या पत्नीला सोडून सविता सोबत राहु लागला. त्यामुळे उत्तमचे दोन्ही भावांची गावामध्ये बदमानी झाली. त्यांचे परिवाराला समाजातील लोक नावबोट ठेवू लागले व त्यामुळे दोन्ही भावांचे लग्न जमत नव्हते. उत्तमच्या या कृत्यामुळे उत्तमच्या परिवाराची समाजामध्ये खूप बदनामी झाली होती. या गोश्टीचा उत्तमच्या दोन्ही भावांचे मनात राग होता. उत्तम हा सविता ला सोडायला तयार नव्हाता त्यामुळे राहुल आणि खुशाल यांनी विजय व आकाश सोबत मिळून उत्तम आणि सविताचा काटा काढायची योजना आखली. उत्तम यांचे नावे असलेल्या शेतीचा भावंडामध्ये पुर्वीपासून आपसी विवाद सुरु होता.

शेतीचा वाद मिटविण्याचे कारण समोर करुन दि. 06/07/2022 रोजी उत्तम याला त्याचे भावांनी बिहाडी गावात बोलाविले व त्यांची हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर बुटीबोरी येथील वेणा नदीच्या पुलावर आले. पुलावरुन दोघांचे मुतदेह नदीमध्ये फेकून दिले. अश्या प्रकारे केवळ परिवाराची बदनामी होत आहे या कारणातून स्वतःची प्रतिष्ठा जपण्याकरीता आरोपी 1) राहुल सुरेश बोडखे, वय 27 वर्ष रा. बिहाडी, 2) खुशाल सुरेश बोडखे वय 29 वर्ष ,रा बिहाडी, 3) विजय वसंतराव बोडखे वय 30 वर्ष रा. बिहाडी आणि 4) आकाश अशोक राऊत वय 24 वर्ष रा. कारंजा घाडगे यांनी मिळून या उत्तम आणि सविता यांची निर्घुन हत्या केली. सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे नेतृत्वात तसचे उपविभागीय पोलीस अधिकारी  पुजा गायकवाड यांचे मार्गदर्षनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण व पोलीस बुटीबोरी, यांचे पथकाने कार्यवाही पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com