“स्वच्छता ही सेवा” अंतर्गत सकाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

नागपूर :- “स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता पंधरवड्यातील स्वच्छता ही सेवा अभियांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा सफाई मित्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात मनपाच्या दहाही झोन निहाय स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.

आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय शुगर, रक्तदाब, व्हायरल इन्फेक्शन व रक्त तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांना आवश्यतेनुसार औषधांचे वाटप करण्यात येत आहे. तरी अधिकाधिक संख्येत सफाई कर्मचार्यांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात मनपाद्वारे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष लेख : नको चिंता उपचाराच्या खर्चाची.. मदत आहे शासनाची..!

Thu Sep 26 , 2024
राज्य शासनाने जनसामान्यांच्या आरोग्य जपण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयांमध्ये उपचाराचा खर्च न पेलणाऱ्या नागरीकांना केंद्रिभूत केले आहे. यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला आहे. समाजातील प्रत्येक घटकाची आरोग्य तपासणी करण्यासाठी अभियान शासन राबवित आहे. राज्याची महत्वाची योजना असलेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com