सावनेर :- स्थानिक लायन्स क्लब मार्फत नुकतेच महाशिवरात्री निमित्य श्रीशंकर देवस्थान वाकोडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे देविदास मदनकर तर सचिव अतुलराव बांगरे आणि प्रा. विलास डोईफोडे, अध्यक्ष लायन्स क्लब यांची विशेष उपस्थिती होती. सदर शिबिरामध्ये मधुमेह, रक्तचाप, हृदयरोग, अस्थमा, नेत्ररोग, दंतसमस्या, नाक – कान – घसा इत्यादीची तपासणी करून गरजूना औषधी वाटप सुद्धा करण्यात आले. उपरोक्त तपासन्यांकरिता अमेय हॉस्पिटलचे डॉ. परेश झोपे, पुण्यानी हॉस्पिटलचे डॉ. शिवम पुण्यानी व डॉ. स्वाती पुण्यानी, आदित्य हॉस्पिटलचे डॉ. अमित बाहेती, आस्था पाथोलॉजि लॅब चे डॉ. प्रवीण चव्हाण तसेच नेत्रतंत्रज्ञ रुकेश मुसळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदानलाभले.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा असून ताण तणावाच्या या युगात सर्वांनी नियमित आरोग्य तपासन्या कराव्यात असे प्रा. डोईफोडे यांनी प्रतिपादन केले. शिबिरात दीडशेच्या वर भाविकांनी आणि ग्रामीण जनतेने शिबिराचा लाभ घेतला. शिबिराकरिता आवश्यक संपूर्ण औषधे प्रवीण टोणपे, किशोर सावल, रुपेश जिवतोडे यांनी प्रायोजित केले होते. कार्यक्रमाचे संचालन रुपेश मदनकर, प्रास्ताविक वत्सल बांगरे, चार्टर प्रेसिडेंट तर आभारप्रदर्शन हितेश ठक्कर यांनी केले. आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोशन भिलावे, वैभव नागपुरे, हितेश पटेल, सुशांत घटे, मनोज पटेल, चित्रा चकोले, ऋषभ कुमेरिया, प्रमोद चव्हाण, भूषण आवारी, शिव ठाकरे, मिलिंद पंडिया, राखी महानंदे, कुणाल भोपे आदींनी मोलाचे सहकार्य केले. लायन्स क्लब च्या सामाजिक उपक्रमांची उपस्थितांनी मुक्तकंठाणे प्रसंशा केली.