मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) :- माहेर महिला मंच कन्हानद्वारे हळदी-कुंकू कार्यक्रम विविध कार्यक्रमाने कन्हान शहरात मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
माहेर महिला मंच कन्हान द्वारे हळदी-कुंकू कार्य क्रमाचे आयोजन कुलदीप मंगल कार्यालय कन्हान येथे करण्यात आले. कार्यक्रम माहेर महिला मंच अध्यक्षा रिता नरेश बर्वे यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी मंच उपाध्यक्षा प्रतिमा घारपिंडे, सचिव सुनिता मानकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी रांगोळी स्पर्धा, अंताक्षरी, रोल प्ले, फॅशन शो, उखाणे, नुत्य स्पर्धा डान्स सह विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर माहेर महिला मंच च्या सचिव सुनिता मानकर यांनी स्वतःचे आत्मबल वाढवुन स्वयं रोजगार तयार कसा करता येईल यावर महिलांना मार्गदर्शन केले. रिताताई बर्वे यांनी आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनातुन महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना स्वतंत्र स्वतःचे जिवन जगण्यास संधी उपलब्ध करून दयावे, त्यांचे आत्मबल वाढवणे, स्वाव लंबी बनवणे व स्वतःचे संरक्षण करणे आदी विषयांवर उपस्थित महिलांना संबोधित केले. मान्यवरांचा हस्ते सांस्कृतिक व विविध कार्यक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राशन दुकानदार संघटना नागपुर ग्रामिण अध्यक्ष पदी सुनीता मानकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शाॅल,श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तदंतर उपस्थितीत महिलांना हळदी कुंकु लावुन वाण वाटप करित अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावि क सुनंदा कटाने यांनी केले. सुत्रसंचालन प्रतिभा बावनकुळे यांनी तर आभार प्रदर्शन अर्पिता डे हयांनी केले. याप्रसंगी कन्हान-पिपरी नगर परिषद नगरसेविका गुंफा तिडके, रेखा टोहने, पुष्पा कावडकर, मीना वाटकर, सविता बावणे, वनिता मसार, छाया रंग, मीना ठाकुर, सरोज राऊत, प्रगती बावनकुळे, सोनिका शर्मा , सुनिता भगवे, रंजिता सूर्यवंशी, कल्पना बागडे, सुमन भिवगडे, वंदना बागडे, प्रतिभा घारपिंडे, विशाखा ठमके, कुसुम बडे, सुनंदा कठाणे, राजकन्या यादव, मेघा उके, मंदा बागडे सह महिला बहु संख्येने उपस्थित होत्या.