भोरगड येथे काली माता मंदिरात महाप्रसादाने चैत्र नवरात्र परवाची सांगता ,शेकडो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

काटोल :- तालुक्यातील भोरगड येथील श्री गजानन महाराज विद्यालय परिसरात चैत्र नवरात्र च्या पर्वावर काली माता मंदिरात अखंड ज्योत विसर्जन व महाप्रसादाने चैत्र नवरात्र परवाची सांगता करण्यात आली सिंधू एज्युकेशन सोसायटी जरीपटका नागपूर द्वारा संचालित श्री गजानन महाराज विद्यालय भोरगड येथील कालीमाता मंदिरात चैत्र नवरात्र च्या पर्वावर संस्थेचे अध्यक्ष विना बजाज यांचे हस्ते अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती संस्थेचे सचिव दीपक बजाज यांचे हस्ते अष्टमी नवमीच्या पर्वावर काली माता मंदिरात पूजा, आरती, हवन करून अखंड मनोकामना ज्योतीचे विसर्जन करून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद कार्यक्रमाला सरपंच उमराव उईके, उपसरपंच रोशन खारपुरिया, संस्थेचे अध्यक्ष विना बजाज ,सचिव दीपक बजाज, कोषाध्यक्ष डीम्पी बजाज ,उपप्राचार्य सुदाम राखडे ,गजानन महाराज विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे ,माजी मुख्याध्यापक एस गवुकर प्रेमराज भोयर ,विसेंबर आकर्ते ,निर्मला कांबळे ,छाया भेलकर ,शंकर रेलवाणी , एस पवार दिलीप कुमेरिया, मंदा बावणे,भीमराव डोंगरे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रदीप ठाकरे यांनी केले व आभार प्रदर्शन छाया भेलकर यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक व गावातील नागरिक उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com