घरफोडी करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या ; 9 लाख 89 हजार 450/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपुर –   शहरातील विविध भागात घरफाेडी चाेरी करणाऱ्या टाेळीतील चार आराेपींना अटक करण्यात नागपुर  पाेलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी त्यांच्या ताब्यातून 9 लाख 89 हजार 450/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून घरफोडीचे एकूण 21  गुन्हे उघडकीस  केले आहे.

प्राप्त माहिती नुसार पो. स्टे. बेलतरोडी हद्दीत जयदुर्गा सोसायटी नं. 01 एकदंत अपार्टमेंट नागपुर येथे राहणारे फिर्यादी रजत नंदकिशोर विश्वकर्मा , 28 वर्ष  आपले सिताबर्डी घरी गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने मुख्य दाराचे कुलूप तोडुन व गेटचे कुलूप तोडुन घराचे आत प्रवेश करून सिसिटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर व वॉशिग मशिन व घराचे कंम्पाउड मध्ये ठेवलेली कार क्रं. एम.पी. 28 सि.बी. 6880 असा एकुण 10,30,000/- रू चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे. बेलतरोडी येथे आरोपी विरूध्द कलम 454,380 भादवि अन्वये गुन्हा नोंदविला होता.

वरील नमुद गुन्हयातील आरोपीच्या शोधार्थ गुन्हे शाखेतील घरफोडी पथक समांतर तपास करित असतांना घटनास्थळी लागलेले लोकल कॅमरे, सि.ओ.सी चे कॅमरे तसेच तांत्रिक पध्दतीचा वापर करून माहीती प्राप्त झाली की, सदरची घरफोडी ही ईको स्पोर्ट कारने झालेली आहे. तसेच ईको स्पोर्ट कारने अंबाझरी, सिताबर्डी, सोनेगाव येथे सुद्रधा त्याच मोडसने घरफोडी झाली आहे. वरील एकत्रीत माहीती वरून तसेच सर्व टोलनाके चेक करून दिनांक 09.07.2022 रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन पाटनसावंगी टोलनाका येथे इको स्पोर्ट कारला थांबवुन त्यात बसलेले इसमांना तब्यात घेवुन सखोल विचारपुस केली. त्यांनी नागपुर शहरात 24.06.2022 रोजी 4 ठिकाणी घरफोडी केल्याचे व त्यापुर्वी 02 वेळा नागपुरला येवुन घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी 1) अनुप भ्रीगुनारायण सिंग वय 36 वर्षे रा. एलआयजी 4, सी सेक्टर, अरेरा कॉलोनी जवळ, शाहपुरा, भोपाल 2) अभिषेक राजु सिंग वय 29 वर्षे रा. एच 1/329,1100 क्वाटर्स, विठ्ठल मार्केट जवळ, अरेरा कॉलोनी, भेापाल 3) इमरान अलवी वल्द इसाक अलवी वय 26 वर्षे रा. ईराफान अली यांचे घरी किरायाने, ईदगाह रोड, सिध्यालपुरा, तह/जिल्हा .हापोड, उत्तरप्रदेश 4) अमीत ओमप्रकाश सिंग वय 34 वर्षे रा. नगर पालिका जवळ, गेहुखेडा, कोलार रोड, तह. हुजूर जि. भोपाल यांना पो.स्टे. बेलतरोडी येथील गुन्हात अटक करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन फोर्ड कंपनीची ईको स्पोर्ट कार क्र. एम.एच. 31 बि.के. 5786, मोबईलफोन, हेडफोन, वॉकीटॉकी, लोखंडी कटर, टॉमी, डुप्लीकेट नंबर प्लेटस् व इतर साहित्य असा एकुण 9,89,450/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कडुन नागपुर शहरातील पो.स्टे. बेलतरोडी, सिताबर्डी, अंबाझरी येथील प्रत्येकी 01, गुन्हा पो.स्टे. नंदनवन येथील 02, गुन्हे व पो.स्टे.सोनेगाव येथील 03 गुन्हे तसेच पो.स्ट. सदरबाजार आग्रा, इंदोर, उज्जैन, भिलवाडा, जयपुर येथील 12 गुन्हे अशा प्रकारे एकुण 21 घफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहे.

सदरची कामगीरी नागपुर शहराचे पोलीस आयुक्त  अमीतेश कुमार,  सह पोलीस आयुक्त  अश्वती दोरजे,  अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)  नविनचंद्र रेड्डी,  पोलीस उप आयुक्त  चिन्मय पंडीत यांचे मार्गदर्शनात व  सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडीत यांचे निर्देशनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया, पो.हवा राजेश देशमुख, नापोअं प्रशांत गभणे, नरेन्द्र ठाकुर, रवि अहीर, प्रविण रोडे, पो.अं सुधिर पवार यांनी केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com