कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी पगारी सुट्टी

यवतमाळ :- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दि. २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघातील क्षेत्रात सर्व कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे आस्थापनांनी सुट्टी द्यावयाची आहे.

निवडणूकीच्या दिवशी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्य निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

सदर सुट्टी सर्व उद्योग, उर्जा, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स ईत्यादींचा समावेश आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी ईत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक आहे.

वर नमूद केल्या नुसार उद्योग, उर्जा, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास, संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharangoli on the occasion of Earth Day by Sanskar Bharti

Tue Apr 23 , 2024
Nagpur :- On the occasion of Earth Day, celebrated annually on April 22nd, a group of 50 artists from Sanskar Bharti created a magnificent Maharangoli at the Sitabardi Metro station. The 1000 square feet rangoli, themed around environmental conservation. Using 40 kg of white rangoli and 40 to 50 kg of gulal, the artists completed the rangoli within five hours. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com