नागपूर :- जनसंघाचे संस्थापक, एकात्म मानव वादाचे प्रणेते पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वानखेडे, भोलाजी खोब्रागडे, भाजप शहर सचिव संघपाल मेश्राम, राम सामंत, विक्रम डुंबरे, गौरीशंकर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंडीत दीनदयाल उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरी केली जाते. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी समाजातील गरीब आणि कमकुवत व्यक्तींच्या विकासातूनच खरा विकास साध्य होणार असल्याची संकल्पना मांडली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकाने देशातील तळागाळातील, कमकुवत शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी अनेक योजनांचा आधार निर्माण केला आहे. त्यामुळे आणि ग्रामिण भागातील व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, असे मत यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.