कुंभारे कॉलोनीत अविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे कामठी
कामठी ता प्र 4:- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका अविवाहित तरुणाने अज्ञात कारणावरून राहत्या घरातील छताच्या लोखंडी हुकला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव कमलेश अरुण पाटील वय 35 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा घरी एकटाच असून घरात कुणीही नसल्याची संधी साधून दिवसाढवळ्या आज दुपारी 3 वाजता गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरिय तपासणीसाठी शवविच्छेदनार्थ कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पश्चात आई व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कांद्री येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०१ व्या जयंती पदयात्रेने साजरी

Mon Apr 4 , 2022
संदीप कांबळे,कामठी – फुलाच्या वर्षाने पालखीचे सेवकांनी केले स्वागत. कामठी : – कांद्री येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०१ व्या जयंती निमित्य मानव मंदिर शाखा कांद्री द्वा रा भव्य पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असुन मान्यवरांचा हस्ते बाबा जुमदेव यांच्या प्रतिमेचे पुजन करून पदयात्रा काढण्यात आली. विविध ठिका णी पदयात्राचे फुलाच्या वर्षाने, अल्पोहार, लस्सी वित रण करून जोरदार स्वागत करित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com