पोलिसांनी दिले आठ गोवंश जनावरांना जीवनदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी नगर मार्गे अवैधरित्या योद्धा पिकअप वाहनाने गोवंश जनावरांची वाहतूक करीत असता रात्रगस्तीवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी वेळीच वाहनाचा पाठलाग करून सदर वाहनावर धाड घालून वाहन जप्त करीत दोन आरोपीना ताब्यात घेत 8 गोवंश जनावरे पारडी नागपूरच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जाणाऱ्या 8 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री साडे नऊ दरम्यान केली असून या धाडीतुन 8 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 15 हजार रुपये व योद्धा पिकअप वाहन-क्र एम एच 40 सी डी 3629 किमती 4 लक्ष रुपये असा एकूण 5 लक्ष 15 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक दोन आरोपीमध्ये शहनवाज खान रहमान खान वय 23 वर्षे रा. नया गोदाम कामठी,अयान खान हातीम खान वय 26 वर्षे रा. न्यू येरखेडा कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे ,पोलीस उपनिरीक्षक राजेश दुबाले,डी बी पथकाचे दिलीप ढगे,अंकुश गजभिये,श्रीकांत भिष्णुरकर,प्रमोल शेळके,इशांत कांबळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा १३ फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा 

Thu Feb 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध न्याय हक्काच्या मागण्यांसंदर्भात १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर महा आक्रोश  मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय कार्यवाह मनोज परते, माजी कार्यवाह उमेश शेंडे, कामठी तालुका अध्यक्ष सतिश दहाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे  केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com