नागपूर :-महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधान परिषदेच्या शिक्षक मतदार क्षेत्राच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नागपूर क्षेत्रातील संपूर्ण 6 जिल्हे व जवळजवळ 65 तालुक्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जाळे पसरलेले आहे. त्यासाठी नागपूर क्षेत्रातील जागा आपण लढवावी असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज्ञा आहे. महाविकास आघाडी समर्पित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ही जागा लढविणार असल्याचे सर्व कार्यकर्ते, संस्था संचालक व इतर मतदारांची संवाद साधला व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीने उमेदवाराची घोषणा करण्यासाठी आज अभ्यंकर प्रांताध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षकांचे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
संपूर्ण विदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेला वाढविण्यात गंगाधर नाकाडे यांचा मोलाचा वाटा आहे. अत्यंत प्रामाणिक, अभ्यासू व तडबदार व्यक्तिमत्व असलेले गंगाधरराव नाकाडे हे आमच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे विभागातील शिक्षक, शाळा व्यवस्थापक याचे सोबत दांडगा परिचय आहे. त्यांना उमेदवारी मिळावी असा प्रस्ताव समोर आला नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत चर्चा करून गंगाधर विश्वेश्वर नाकाडे यांना उमेदवारी निश्चित झाली. आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या, व शिक्षकांच्या दर्जा, याविषयी आपली बाजू विधिमंडळात उत्तमरीतीने मांडण्यासाठी गंगाधर नाकाडे सक्षम आहेत. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी यांना विनंती केली आहे की, प्रथम पसंतीचे मत देऊन त्यांना विजयी करावे. असे पत्र परिषदमध्ये पत्रकारांना सांगितले .पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित ज. मो.अभ्यंकर, गंगाधर नाकाडे, ज्ञानेश्वर गलांडे, देवल नाकाडे, विनय बावनकर, आणि अजय राठोड यांची उपस्थिती होती.