उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

नागपूर :- विदर्भातील झाडे कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वसतीगृह, ई-लायब्ररी व अभ्यासिका भवन अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

नागपुरातील झाडे कुणबी समाजाच्या वतीने झाडे कुणबी समाज भूखंड, पिपळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे, झाडे कुणबी समाज नागपूरचे अध्यक्ष राजेश चुटे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

शिक्षणासाठी आणि मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी हे वसतीगृह फायद्याचे ठरेल. जोपर्यंत समाजाच्या विकास होत नाही तोपर्यंत राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होऊ शकत नाही. संस्था समाजाला एकत्रित करून संघटित करीत असतात. नवनवीन सोपान गाठण्याच्या प्रयत्नाला या प्रकल्पातून हातभार लागतो.

समाजाच्या विकासकामांसाठी तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

डॉ. प्रभाकर हेमणे यांच्या पुस्तकाचे विमोचन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NIT घोटाले में रडार पर कई अधिकारी, कैसे चोरी हुए दस्तावेज, खंगालने में जुटी पुलिस 

Mon Feb 5 , 2024
नागपुर :- नागपुर सुधार प्रन्यास के दस्तावेज चुराकर उनके आधार पर फर्जी दस्तावेज तैयार कर प्लॉट बेचने वाले गिरोह का पुलिस ने हाल ही में पर्दाफाश किया है. इस मामले को लेकर चल रही सघन जांच में अब कई तथ्य उजागर हो रहे हैं. सर्वप्रथम प्रन्यास से दस्तावेज कैसे चोरी हुए? इसे लेकर ही पुलिस विभाग जांच में लगा हुआ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com