कन्हान नदी काठावरील कांद्रीच्या पंप हाऊस मधुन १९३०० रूपयाचे सामान चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – ग्राम पंचायत कांद्री ला पाणी पुरवठा कर ण्या-या कन्हान नदी काठावरील राणी बगीचा पिपरी येथील पंप हाऊस मधिल पंपचे केबल, लोखंडी सिडी, लोखंडी बोर्ड, सबल व इतर साहित्य असे एकुण १९३०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने पोस्टे कन्हान ला गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपी चा शोध घेत आहे.
मागील १० दिवसा पासुन सतत पाऊस सुरू असुन व पेंच धरणाचे पाण्याचा विसर्गाने कन्हान नदी भरून वाहत असल्याने ग्राम पंचायत कांद्री ला पाणी पुरवठा करण्या-या गाडेघाट रोड राणी बगीचा पिपरी कन्हान नदी काठावरील पंप हाऊस मध्ये १० ते १२ दिवसा पासुन सुरक्षा रक्षकाची डयुटी लावण्यात आली नव्हती. शनिवार (दि.१६) जुलै ला ग्राम पंचायत कांद्री पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंप हॉउस सुरू करण्याचे ठरवुन सर्व जण राणी बगी चा गाडेघाट रोड पिपरी कन्हान नदी काठावरील पंप हॉऊस ला गेले असता तिथे ईलेक्ट्रीक केबल उखळले ला दिसल्याने सर्वांनी तिथे असलेला सामानाची पाह णी केली असता पंप हॉउस मधिल १) मोटर पंपचे केवल८० मिटर अंदाजे किमत १५००० रू.२) लोखंडी सिडी अंदाजे किंमत २००० रू.३) एक लोखंडी बोर्ड अंदाजे किंमत १५०० रू. ४) ९ लोखंडी सबल व ईतर साहित्य अंदाजे किंमत ८०० रूपये असा एकुण १९३ ०० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने (दि. १५) जुलै चे रात्री चोरून नेल्याने ग्रा प कांद्री पाणी पुरवठा कर्मचारी फिर्यादी बाबुराव ताराचंद मनगटे वय ५१ वर्षे राह. कांद्री कन्हान यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अप क्र. ४२२/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कृपासागर भोवते यांचा सेवानिवृत्तवर सत्कार

Sun Jul 17 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  भोवते सरांनी ५ वी च्या विद्यार्थ्याना संविधान पुस्तिका देऊन सामाजिक कार्याची सुरूवात. कन्हान : – अखिलेश हायस्कुल साटक येथे २७ वर्ष ७ दिवस सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने संस्था व हाय स्कुल व्दारे कृपासागर शामराव भोवते यांच्या समारंभासह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झाल्याने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्याना संविधान पुस्तिका देण्याचे ठरवुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com