जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित 

जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित 

नागपूर दि. 16: क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा युवा पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी शासनामार्फत देण्यात येतो. नागपूर जिल्ह्यातील युवक युवती व संस्थांनी सन 2022-23 या वर्षासाठी अर्ज सादर करावे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

पुरस्काराचे स्वरुप : 

जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवतीस, एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्ती 10 हजार रुपये (प्रती युवक व युवती) व संस्थेसाठी गौरव पत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम 50 हजार रुपये अशा स्वरुपाचा असेल.

युवक व युवतीसाठी पात्रतेचे निकष :

अर्जदार युवक व युवतींचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी जिल्ह्यात 10 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागातून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती व फोटो). अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा अर्जदार युवक व युवतींचे पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com