संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या खरबी-बहादुरा नगर पंचायत येथे माजी जिल्हा परीषद अध्यक्ष सुरेश भोयर व काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले व या प्रसंगी भव्य कार्यकर्ता मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष.मुक्ता कोकाडे, जि.प. सभापती.अवंतिका लेकुरवाळे,नागपूर जिल्हा ग्रामीण सेवादलचे अध्यक्ष तुळशीराम काळमेघ, नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अजय राऊत,वसंतराव लांडगे,बेनीराम राऊत, नारायण कापसे, खरबी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सचिन मांडवकर,विनोद शिंदे,शबनम खान ,सामाजिक कार्यकर्ता आंबटकर ,बालू लांडगे व सर्व प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामठी विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सचिन उईके, राजु रहांगडाले,अभिषेक माहुले व त्यांच्या सर्व युवक सहकारी मंडळीने मोलाची भूमिका साकारली.