‘महाज्योती’च्या प्रशिक्षण पूर्व परीक्षेत विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

– एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, युपीएससी, एमपीएससी, पायलट ट्रेनिंग, 

– पीएचडी स्कील डेवलपमेंट परीक्षेचा निकाल जाहीर

नागपूर :-बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदि पदांच्या परीक्षेकरिता ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. गरजू आणि योग्य विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याच्या अनुषंगाने संस्था प्रशिक्षणापूर्वी परिक्षा घेण्यात येते. 2023 साली एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, यूपीएससी, एमपीएससी, पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंटकरिता घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचा निकाल आज महाज्योतीतर्फे जाहिर करण्यात आले असून यात विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादित केले आहे, अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रा. खवले यांनी दिली.

राजेश खवले यांनी सांगितले की, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एमपीएससीचे 1000, एमपीएससी संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ चे 1000, युपीएससी (इंग्रजी) 1000 तर युपीएससी (मराठी) 750 यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण निहाय आकस्मिक निधी आणि विद्यावेतन देखील दिले जाणार असल्याचेही राजेश खवले यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ‘ब’ व ‘क’, संघ लोकसेवा आयोग इंग्रजी व मराठी माध्यम या परीक्षा प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा 25, 26, 27, 28, 29 ऑक्टोबर व 4 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गृप बी व गृप सी चाळणी परीक्षेचा निकाल 25 नोव्हेंबर 2023 जाहीर करण्यात आला आहे. तसेच 27 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. तसेच 28 नोव्हेंबर 2023 ला संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) इंग्रजी व मराठी माध्यम चाळणी परीक्षेचा निकाल संस्थेद्वारे जाहीर करण्यात आल्याचेही राजेश खवले यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणचा लाभ घ्यावा

महाज्योतीच्या या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सुलभ होणार आहे. स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाकरिता निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा परिपूर्ण लाभ घ्यावा व प्रशिक्षण वर्गामध्ये 100 टक्के उपस्थिती दर्शवून आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे माननीय मंत्री अतुल सावे तसेच महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची योजना निहाय माहिती खालील प्रमाणे

अ.क्र परीक्षेचे नाव विद्यार्थी संख्या

1 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) -1000

2 महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ परीक्षा पूर्व प्रशिक्षण -1000

3 संघ लोकसेवा आयोग (UPSC) इंग्रजी -1000

4 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मराठी -750

प्रशिक्षण निहाय खालील प्रमाणे आकस्मिक निधी आणि विद्यावेतन

अ.क्र परीक्षेचे नाव अकस्मिक निधी विद्यावेतन

1 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) -12 हजार रुपये -10 हजार रुपए

2 महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ परीक्षा पूर्व प्रशिक्षण- 12 हजार रुपये -10 हजार रुपए

3 संघ लोकसेवा आयोग (UPSC) इंग्रजी -18 हजार रुपये -13 हजार रुपए

4 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मराठी -12 हजार रुपये -10 हजार

NewsToday24x7

Next Post

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Wed Nov 29 , 2023
– चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना Your browser does not support HTML5 video. मुंबई :- राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com