उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा जनतेशी संवाद

नागपूर :- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व निवेदने स्वीकारली.        नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातील सहभागानंतर फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपुरच्या विविध भागातील नागरिक आले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील त्यांच्या कार्यालयात नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली.          विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी या सर्वांची निवेदने स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवीन सभाकक्षाचे भूमिपूजन

Mon Sep 11 , 2023
– सभाकक्षात गुणात्मक व सुसज्ज सुविधा नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या सुमारे आठ हजार चौरस फुट जागेत बांधण्यात येणाऱ्या बार सभाकक्षाचे आज भूमिपूजन झाले. नागपूर उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास न्यायमुर्ती (प्रशासकीय) अतुल एस. चांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी न्यायमुर्ती अनिल सांबरे, अविनाश घरोटे, अनिल किलोर, मुकालीका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com