संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारत भूमी संपूर्ण विश्वात संतभूमी म्हणून प्रसिद्ध आहे .या भूमीच्या कणाकणात हजारो साधकांच्या आत्मचिंतनाने व्याप्त ईश्वरीय ऊर्जा निरंतर प्रवाहित आहे.तो परमेश्वर जो सर्वांचा निर्माता आहे ,विभिन्न कालखंडात वेगवेगळ्या नामच रुपात प्रगट होऊन भटकलेल्या मानवांना मार्गदर्शन करण्यासाठी धरतीवर संताच्या रुपात अवतरीत होतो अशेच एक मानवतेचे उपासक बाबा ताजुद्दीन औलिया आहेत असे मौलिक प्रतिपादन नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर यांनी कामठी बस स्टँड चौकात जीप ऑटो युनियन च्या वतीने आयोजित महान संत ताजुद्दीन बाबा यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
सर्वप्रथम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संत ताजुद्दीन बाबा औलिया यांच्या प्रतिमेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन वाहत केक कापून अल्पोहहार वितरित करून संत बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रामुख्याने पोलीस विभागाचे मंगेश लांजेवार, पप्पू यादव, समाजसेवक उदास बन्सोड, सुमित गेडाम,राकेश पांडे, नितीन रावेकर, निलेश रावेकर,लक्ष्मीबाई पांडे,नितु दुबे प्रमुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीप ऑटो युनियनचे राकेश पांडे, दत्तूजी गिरी, नानेश्वर ठाकरे,छोटे लोंढे,सुनील यादव,गुलरेज शेख,विक्की कयकाढे, ललित बलटी, रोहित कनोजे,किशोर टोमसे, मुकेश प्रजापती, लखन (अण्णा)सिंगीनवार, राम(अण्णा)सिंगीनवार,तणवीर हुसेन, प्रमोद गंढे, नानिया आदीनी मोलाची भूमिका साकारली.