रामटेक :- पंचायत समिती रामटेक चे सभापती संजय नेवारे हे नुकतेच अपात्र झाले. यानंतर काल दि. ११ ऑगस्टला पंचायत समिती रामटेकच्या सभापती पदाचा कार्यभार उपसभापती नरेंद्र बंधाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शुक्रवारी सभापती कार्यालयात झालेल्या साध्या सोहळ्यात भाजपचे रामटेक तालुका अध्यक्ष व पं.स. उपसभापती नरेंद्र बंधाटे यांच्याकडे बि.डी.ओ. जयसिंग जाधव यांच्या हस्ते पदभार सोपविण्यात आला. सभापती पदाची अधिकृत निवड होईपर्यंत ते या पदाचा कार्यभार सांभाळतील. यावेळी पंचायत समितिचे सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त सभापती नरेंद्र बंधाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वांच्या समन्वयाने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली. बीडीओ जयसिंग जाधव म्हणाले की, अधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यास काम सोपे होते. यावेळी प्रामुख्याने रामटेक चे माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख,भाजप शहर अध्यक्ष आलोक मानकर, देवलापारचे हेमंत जैन, विवेक तोतडे, वनमाला चौरागडे, डाॅ.सुधिर नाखले यांच्यासह वक्त्यांनी आपले विचार मांडले. नंतर उपस्थित मान्यवरांनी सभापती नरेंद्र बंधाटे यांचा शाल, श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कला ठाकरे, पं.स. सदस्या अश्विता बिरनवार, संजय मुलमुले, राजेश जैस्वाल, सुंदरलाल टाकोट, शरद गुप्ता, मनीष मडावी, चंद्रभान धोटे, प्रभाकर खेडकर, रामानंद अडामे, डॉ.सुधीर नाखले, पप्पू यादव, वसंता कोकोटे, करीम मालाधारी, उज्वला धमगाये, चंद्रमणी धमगाये, विनायक बांते, चंद्रशेखर माकडे, सरदार शेख, उमेश पटले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.