मुंबई :- स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ हे अभियान शुक्रवारपासून संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जाणार आहे. त्याचे औचित्य साधत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात उपस्थित पत्रकारांना शुक्रवारी तिरंगा देऊन या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.