संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे डीजी इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे डायरेक्टर डॉ. ए. राजा गोपाला राव आणि डॉ. प्रशांत शिर्के यांनी पोरवाल महाविद्यालयातील बी. ए.,बी.कॉम. बी.एस्सीच्या विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रामध्ये विविध नोकरीच्या संधी कशा आहे. याबद्दल कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला डॉ. ईफ्तेखार हुसेन वाणिज्य विभाग प्रमुख,डॉ. तुषार चौधरी सहयोगी प्राध्यापक,डॉ. अझहर अबरार उर्दू विभागप्रमुख, डॉ. महेश जोगी मराठी विभागप्रमुख, डॉ. विकास कामडी हिंदी विभागप्रमुख हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार चौधरी यांनी केले. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.प्रशांत शिर्के यांनी आपल्या व्याख्यानातून बीए, बीकॉम बीएससीच्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये नोकरीच्या विविध संधी असून त्या त्यांनी डीजी इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव मॅनेजमेंट हा कोर्स करून भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यासाठी आमचे हे इन्स्टिट्यूट नेहमीच विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार आहेत विद्यार्थ्यांनी आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये येऊन एक कोर्स पूर्ण करून नंतर परदेशामध्ये सुद्धा नोकरीसाठी आणि भारतात सुद्धा नोकरीसाठी तयार व्हावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानंतर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. ए.राजा गोपाला राव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून सहकार क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने विविध संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत याबद्दल सांगितले आणि हे सहकार क्षेत्र पुढच्या पिढीने कशा पद्धतीने आत्मसात करून त्यातून देशाचा विकास करावयाचा आहे हे सुद्धा संक्षिप्तपणे सांगून विद्यार्थ्यांना अतिशय प्रोत्साहित केले. त्यांनी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी सदैव कुठल्याही कामासाठी आले तरी दरवाजे खुले आहे हे खुल्या दिलाने विद्यार्थ्यांसमोर सांगितले. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विनय चव्हाण यांचे सुद्धा खूप कौतुक केले. कारण त्यांनी आमच्या एका फोनवर आणि पत्रावर आपल्या महाविद्यालयात येण्यासाठी आम्हाला निमंत्रित केले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी खूप मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. असे आपल्या मनोगतातून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. इफ्तेखार हुसेन यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करतांना डॉ. ए. राजा गोपाला राव आणि डॉ. प्रशांत शिर्के या पाहुणे मंडळींचे आभार मानले. आणि विशेष आभार सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी मानले.
ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी भरगच्च संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.