एम.पी.एस.सी.राज्यसेवा परीक्षेत महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! 

 – एकूण 403 विद्यार्थ्यी अंतिम यादीत

–  34 विद्यार्थी पहिल्या शंभरात!

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.

महाज्योतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रसिद्धी करण्यात आलेली होती, त्याकरिता एकूण 439 उमेदवारांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी योजनेकरिता पात्र 437 विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता प्रत्येकी 25 हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आलेले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेचा निकाल 28 फेब्रुवारीला जाहीर झाला आहे. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या 437 विद्यार्थ्यांपैकी 403 महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेत यश मिळाले आहे. त्यातील 216 विद्यार्थी इतर मागास वर्ग, 39 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती –ब वर्गातील 23 विद्यार्थी, भटक्या जमाती –क मधील 70 तर भटक्या जमाती –ड मधील 47 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे तसेच 8 विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना देखील अंतिम परीक्षेत यश मिळाले आहे.

एमपीएससीच्या अंतीम यादीतील पहिल्या शंभरात 34 विद्यार्थ्यांना स्थान मिळाले आहे. या यशाबाबत महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“महाज्योतीच्या मार्फत प्रशासनात उत्तम अधिकारी यावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची फलश्रुती म्हणून या यशाकडे बघितले पाहिजे, एम.पी.एस.सी.राज्यसेवा परीक्षेत महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

विद्यार्थींनीचे मनोगत:

महाज्योती मार्फत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे, त्याचा परिणाम आपल्याला अंतिम निकालात दिसत आहे. महाज्योती मार्फत अशा परिणाम कारक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले त्यांचे अभिनंदन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले केले.

“महाज्योती ने केलेल्या अर्थसहाय्यामुळे तणावाच्या स्पर्धेत मानसिक आधार मला मिळाला या अर्थसहाय्यातून मला स्पर्धा परीक्षेकरिता पुस्तके घेता आली, आवश्यक मार्गदर्शन घेता आले त्यामुळे या अर्थसहाय्याचा मला लाभ झाला, महाज्योतीने ही योजना अशीच सुरु ठेवावी जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल.”

-अमोल जनार्धन परिहार (जि.बुलढाणा) MPSC रँक 13

“मुख्य परीक्षेनंतर व्यक्तिमत्व चाचणीसाठी विविध ठिकाणी मार्गदर्शन घ्यावे लागते अशा वेळेस मला महाज्योतीने केलेल्या अर्थसहाय्याचा लाभ मिळाला व त्याचा उपयोग मला अंतिम तयारीसाठी झाला त्याबद्दल मी महाज्योतीची आभारी आहे.”

-सायली श्याम ठाकूर (जि.रायगड) MPSC रँक 40

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com