संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 10 :- स्थानीक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साई मंदिर जवळील लोखंडी पुला खाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजता निदर्शनास आली .मृतदेहाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे जखमा नसून मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नसले तरी थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाल्याचा तर्क लावण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळं गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाला नंतरच कळेल.