नागपूर :-भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या मान्यतेने “सचिव महाराष्ट्र प्रदेश” चित्रपट कामगार आघाडी या पदावर मृणाल यादव यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
आपण आपल्या संघटन कौशल्याने आपल्या विभागात भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे संघटन वाढवावे, विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त श्रमिकांना भाजपामध्ये सहभागी करण्यासाठी आपण अथक परिश्रम घ्याल अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.