सिमेंट चे दोन विधृत खांब तोडुन २००० मिटर अँल्युमिनियम ताराची चोरी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

 सिहोरा बौद्ध बिहारा जवळील घटना, कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा बौद्ध बिहारा जवळील विधृत सिमेंट चे दोन पोल तोडुन २००० मिटर अँल्युमिनियम तार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रल्हाद ओमकार यांच्या तक्रारीने पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

         प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.८) डिसेंबर ला सकाळी ८ ते ८:३० वाजता दरम्यान कन्हान महावित रण केंद्राचे सहायक अभियंता प्रल्हाद बुध्दुलाल ओम कार वय ३८ वर्ष रा. हनुमाननगर कन्हान यांना किशोर बेलसरे राह. शिवनगर कन्हान यांंनी फोन करून सांगि तले कि माझ्या धाब्यावरील विधृत बंद झाली आहे. अशी माहिती दिल्याने प्रल्हाद ओमकार यांनी लाईन मेन राजेश कनोजिया यांना फोन लावुन सांगितल्याने राजेश यांनी जाऊन पाहीले असता सिहोरा बौद्ध बिहा रा जवळील विधृतचे दोन सिमेंट खांब तोडुन पडलेले आहे. त्याचे नुकसान २०,००० रूपये झाले असुन या दोन सिमेंट विधृत खांबावरील अँल्युमिनियम तार ५०० मीटर प्रमाणे एका खांबाचे चार तार नुसार एकुण २००० मीटर तार अज्ञात चोरटयाने चालु लघुदाब वाह नी बंद करून विधृत सिमेंट खांब तोडुन त्यावरील २००० मीटर तार अंदाजे किंमत ५५,००० रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून पसार झाल्याचे फोन करून सहाय्यक अभियंता ओमकार हयाना सांगितल्याने त्यांनी घटनास्ळी जाऊन पाहणी केली. कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रल्हाद ओमकार यांचे तक्रारीने पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि सहकलम १३७ भाविका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com