आजपासून मोर्शी तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र होणार सुरू ! 

– मोर्शी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ! 

– विविध मान्यवरांच्या हस्ते कापूस खरेदी केंद्राचे आज होणार उद्घाटन ! 

दापोरी :- मोर्शी तालुक्यात दापोरी हिवरखेड परिसरामध्ये शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली होती परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आजपासून दापोरी हिवरखेड परिसरामध्ये पांडव जिनिंग प्रेसिंग इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड कंपनी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. या खरेदी केंद्रांवर शासनाने कापसासाठी जो काही हमीभाव जाहीर केला आहे त्यानुसार खरेदी करण्यात येत असल्यामुळे नक्कीच यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे.

मोर्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे लागवड होते. परंतु जर आपण यावर्षी कापसाची स्थिती बघितली तर अत्यंत कमी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय हमीभावापेक्षा देखील कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परंतु आता मोर्शी तालुक्यात दापोरी हिवरखेड परिसरामध्ये शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून आता आनंद व्यक्त केला जात आहे.

मोर्शी तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरात कपाशीची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर होते व यावर्षी कपाशीचे पीक चांगले आले असताना खाजगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मात्र शासकीय हमीभावापेक्षा देखील कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत होता. परंतु आता शासकीय हमीभाव केंद्र सुरू केल्यामुळे खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून देखील कापसाच्या दरात निश्चित वाढ केली जाईल अशी एक शक्यता आहे. दापोरी परिसरामध्ये सीसीआय अंतर्गत कापसाचे खरेदी केंद्र सुरू केल्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आज 15 जानेवारी रोजी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार अमर काळे, अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखडे, आमदार उमेश यावलकर, माजी आमदार यशोमती ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन ठोके, उपसभापती संजय तत्ते, गिरीश पांडव, दिलीप कांबळे, रुपेश नंदनवार, लाभेष लोखितकर, संजय पांडव, परिसरातील शेतकरी यांच्यासह आदी मंडळींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा घणाघात : गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील वक्तव्याचा घेतला समाचार

Thu Jan 16 , 2025
नागपूर. आजन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन आलेल्या शरद पवारांची सत्तेच्या विना तडफड सुरु झाली. त्यांच्यामध्ये वैफल्यग्रस्तपणा आणि निराशा आली आहे. त्याच निराशेतून त्यांनी देशाचे लोकप्रिय गृहमंत्री आणि पहिले सहकारीता मंत्री अमित शाह यांच्याबाबत निषेधार्ह वक्तव्य केले, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवित ॲड. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!