आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध, प्रकाश हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये रोटी बँक ट्रस्टची ग्वाही

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध असुन शक्य ती मदत करण्याचे आश्वासन रोटी ट्रस्ट नागपुर तर्फे प्रकाश हायस्कुल & ज्युनिअर कॉलेज, कांद्री माईन येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले.

शनिवार (दि.५) रोटी बँक ट्रस्ट नागपुर च्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश हायस्कुल & ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन ला सदिच्छा भेट दिली. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वान खेडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन रोटी बँक ट्रस्टचे अध्यक्ष चंद्र बगडीया, पदाधिकारी संजय सरकार, राकेश गुप्ता, राजेंद्र दुवा, संजय पन्नासे,  रिजवान, मॉयल कार्मिक अधिकारी ललित अडसरे उपस्थित होते. यावेळी रोटी बँक ट्रस्टचे अध्यक्ष चंद्र बगडिया यांनी आदिवासी बहुल भागातील शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज करुन सर्व विद्यार्थ्यांना शक्तीवर्धक खाऊचे वाटप केले.

मॉयल येथील कार्यक्रमात व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केलेल्या विद्यार्थ्यांचा कार्मिक अधिकारी ललित अडसरे व उपस्थितांच्या हस्ते बक्षीस देऊन विशेष कौतुक करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे यांनी रोटी बँक ट्रस्ट, नागपुर तर्फे शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन कामिनी पाटील यांनी तर आभार अशोक नाटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्याम गासमवार, विजय लांडे, प्रशांत सरपाते, सुचिता बिरोले, अनिता खंडाईत, ज्योत्सना मेश्राम, ठकराले बाबु, प्रभाकर खंडाते आदीनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur City Police issues Advisory

Sat Aug 5 , 2023
Nagpur – It has come to our notice that certain Bars/Permit Rooms/Restaurants etc are operating beyond the stipulated time limit of 01:30 A.M. This is in clear violation of our even numbered order u/s 144 CrPC dated 29/06/2023. It is noticed that brawls are primarily happening in such establishments which are operating beyond time limits and having severe implications on […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com