डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत एकदिवसीय कार्यशाळा

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व वसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुचीत करण्यात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनाबाबत माहिती, जनजागृती व प्रचार करण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,गडचिरोली येथे दि. 26 मे 2023 रोजी शुक्रवारला सकाळी 11.00 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर यांच्या हस्ते होणार असून कार्यशाळेला उपायुक्त, जात पडताळणी, संशोधन अधिकारी जात पडताळणी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गडचिरोली, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गडचिरोली, प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली व जिल्हयाती समान संधी केंद्र स्थापन झालेले सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व स्वाधार योजनेचे लाभार्थी मुले/मुली उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती पथ कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन अमोल यावलीकर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 20 लाखापर्यंत

Thu May 25 , 2023
गडचिरोली :- शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights