१९ तारखेला आशावर्कर सोबत, कोवीडयोद्धा होणार मोर्चात सामील – कॉ.राजेंद्र साठे

नागपूर :- नागपूर येथे ए के जी भवन,सीटू कार्यालयात कोव्हिड योध्दा यांचा मेळावा, म्युनिसिपल कामगार एकता युनियन कडून, दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. या मेळाव्याला सिटू युनियनचे नागपूरचे अध्यक्ष काॅ.डाॅ. मोहमद ताजुद्दीन सचिव कॉ. राजेंद्र साठे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच अध्यक्ष काॅ.मनोज यादव, सचिव काॅ.जगनारायन कहार, उपाध्यक्ष काॅ.प्रमोद नवार, नेते काॅ.अशोक पवार, काॅ.अभिजित जाधव व स्थानिक कोव्हिड योध्दे,संदेश पाटील, चंदा भोबडे,अमित वरेकर,अश्विनी देशभ्रतार, कुसूम साहू, अर्चना सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. एकूण २० जणांची कोअर कमिटी बनली. कार्यक्रमाला प्रीती मेश्राम, मंगला जूनघरे उपस्थित होत्या. युनियन कडून तीन मागण्या मांडल्या आहेत

१.कोव्हिड योध्दयांना आरोग्य व्यवस्थापनात अग्रक्रमाने भरतीत प्राधान्य दिले जावे.

२.कोव्हिड भत्ता देण्यात यावा

३.सानुग्रह अनुदान देण्यात यावे

एकीचा निर्धार व्यक्त केला गेला.मेळावा जोशपूर्ण उत्साहात पार पडला गेला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com