शहर महिला काँग्रेस कमेटी व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर युनियन

कन्हान : –   जागतिक महिला दिना निमित्त कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटी व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर युनियन (इंटक ) तसेच विनय यादव मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमा ने हनुमान नगर पाणी टाकी परिसरात श्रम कार्ड, वोटिं ग कार्ड, हेल्थ कार्ड तसेच शरीराच्या हाडाची तपासणी निशुल्क शिबीराचे आयोजन करून जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला.         
कार्यक्रम कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटी  अध्यक्षा सौ. रिताताई नरेश बर्वे यांचे अध्यक्षेत व प्रमु ख पाहुणे इंटक नेते मा. एस क्यु जमा, प्रेमलता दीदी, डॉ.उमा शर्मा, इंटक नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे, इंटक नेत्री अंजु सिंग, फरद सिद्दीकी, सलमा खान आदी च्या प्रमुख उपस्थित नारी शक्तीला नमन व दिप प्रज्वलित करून श्रम कार्ड, वोटिंग कार्ड, हेल्थ कार्ड तसेच शरीराच्या हाडाची तपासणी निशुल्क शिबीरा ची सुरूवात करण्यात आली. या निशुल्क शिबिराचा परिसरातील महिलांनी लाभ घेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय यादव यानी करून सुत्रसंचालन सौ. प्रणाली योगेंद्र रंगारी हयानी तर आभार सौ. गौतमी गजभिये यांनी व्यकत केले. याप्रसंगी नगरसेविका सौ. गुंफाताई तिडके, कल्पना नितनवरे, कु. रेखा टोहने, पुष्पा कावड कर, नगरसेवक योगेंद्र (बाबु) रंगारी, मनिष भिवगडे, विनय यादव, पप्पु जमा प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अबरार सिद्दीकी, शेखर बोरकर, अमोल प्रसाद, स्वप्नील मते, शरद वाटकर,  आकाश महातो, वीरेंद्र सिंग, तालिब सिद्दीकी, नदीम जमा, आकाश रहिले, शिवाजी, विनोद पाली, कमलेश गोसावी, रामप्रताप सिंग, राजपुत, विजय तिवारी, रोहित माहुल, गौतम रंगारी, प्रशांत मसार, चंदन मेश्राम , दिपक तिवाडे, छाया रंग, सुनिता मानकर, मीना वाटकर, सुवर्णा शिंदे, कुंदा रंगारी, अश्विनी वाघमारे, रंजनी अहिर, वैजयंती अंबादे, उर्मिला तिरपुडे, शुभांगी खुरपुढे, सुनंदा ढोले, राधा चौहान, जयवंती जामगडे, प्रमिला रंगारी, शोभा मेश्राम, सत्यफुला मेश्राम, लता रोकडे, कमल रामटेके, इंदु नागपुरे, हिराबाई चकोले, वनिता काळे, भाग्यवंती भेलावे आदीने सहकार्य केले. शिबीरास बहु संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महिला दिनी भाजपाद्वारे आरोग्य मातृशक्ती पुरस्कार प्रदान

Thu Mar 10 , 2022
भाजपा वैद्यकीय आघाडीचे आयोजन… नागपुर – स्वप्न भाजपाचे, मातृशक्तींच्या उत्तम आरोग्याचे ! हे ब्रीद साकारताना भाजपा वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या युवा नारीशक्तींना  आरोग्य मातृशक्ती पुरस्कार भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनात व राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात लाईफस्टाईल दिसोर्डर तज्ञ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!