अंभोरा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून तयार होईल, या प्रकल्पामुळे 2000 तरुणांना रोजगार मिळेल – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

अंभोरा पर्यटन स्थळ विकासाकरिता 200 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता मिळणार –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुर ते उमरेड या चार पदरी रस्त्याचे लोकार्पण

नागपूर :-नागपूर उमरेड मार्गावर असणाऱ्या अंभोरा या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्याकरिता सिंचन विभागातर्फे 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून गोसीखुर्द बॅकवॉटर मध्ये कॅप्सूल लिफ्ट , हॉटेलिंग , क्रूज टुरिझम , जेट्टी प्रवास , जलपर्यटन यासारख्या उपक्रमातून अंभोरा हे जागतिक दर्जाचे आकर्षण असणारे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल .या पर्यटन प्रकल्पामुळे येथील 2,000 तरुणांच्या हातांना काम मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -एन एच आय द्वारे नागपूर उमरेड या राष्ट्रीय महामार्ग – 353 डी च्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते उमरेड बायपासजवळील योग भवन येथे आयोजित कार्यक्रमात झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमरेडचे आमदार राजू पारवे प्रामुख्याने उपस्थित होते .नागपूर -उमरेड हा चौपदरीकरण झालेला रस्ता 41 किलोमीटर लांब असून यासाठी 782 कोटी रुपये खर्च आलेला आहे .

उमरेड ते नागपूर हा रस्ता ग्रीन रोड म्हणून तयार करण्यासाठी एनएचएआय तर्फे रस्त्याच्या 3 मीटर अंतरापर्यंत वृक्षारोपण करण्यात येणार आहे . या मार्गामुळे नागपूर बरोबरच उमरेड भिवापूर ,आरमोरी या ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे . या रस्त्यामुळे कोळसा, कृषीमाल यांची वाहतूक सुलभरीत्या होणार असून यामुळे येथील उद्योग विकास सुद्धा वाढणार आहे .हा महामार्ग विकासाचा असणार असून यामुळे तरुणांना रोजगार मिळेल . उमरेड , भिवापूर , कुही या ठीकाणी आर्थिक संपन्नता येईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले .

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तलाव खोलीकरणाच्या कामातून रस्त्यांचे दर्जेदार कामे पश्चिम विदर्भात झाली . त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात सुद्धा मांगली , हळदगाव, वडेगाव , उकडवाही पांढराबोडी या सहा तलावातून खोलीकरण झाल्याने उमरेड भागातील शेतकऱ्यांना 1 लाख 672 क्युबीक मीटर एवढा जलसाठा उपलब्ध झाला असून यातून सिंचन व पेयजलाची सुविधा निर्माण होणार आहे . अशी माहिती गडकरी यांनी दिली . उमरेड शहरासोबतच उमरेड -भिवापूर या रस्त्याचे चौपदरीकरण सुद्धा आपण करू . उमरेड ते बुटीबोरी या रस्त्याकरिता केंद्रीय रस्ते निधीतून 20 कोटी रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी दिलं .

नागपूर -उमरेड – वडसा – चंद्रपूर – गोंदिया या मार्गावरील ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून .या कामाला सुद्धा काही महिन्यात प्रारंभ होईल . 140 किलोमीटर प्रति तास या ब्रॉडगेज मेट्रोचा वेग असून नागपूर ते उमरेड हे अंतर केवळ 25 मिनिटात पार करणे शक्य होईल असेही त्यांनी सांगितलं . उमरेड ते नागपूर या चौपदरी रस्त्यावर रस्ता सुरक्षा च्या हेतूने सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केलं .

याप्रसंगी उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड ते नागपूर हा एक आधुनिक आणि गतिशील असा रस्ता असून रस्ते हे विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात विकासात कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते असे त्यांनी सांगितले .नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला गडचिरोली , गोंदीया पर्यंत आपण नेणार आहोत . याचे उद्घाटन सुद्धा जानेवारीत करू असं त्यांनी सांगितलं . नागपूर ते गोवा दरम्यानचा रस्ता मराठवाडा कोल्हापूर या भागातून जाणारा एक्सेस कंट्रोल रोड असल्याने . या भागात लॉजिस्टिक हब उदयास येतील . अंभोरा येथील पर्यटन केंद्र तयार करण्याच्या उद्देशाने नियामक समितीच्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला देऊन पर्यटनाचे मोठे सर्किट या ठिकाणी आपण तयार करू असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं .

याप्रसंगी उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी उमरेड तालुक्यातील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प ,शहरातील रस्त्यांना बाह्य वळण रस्ताजोड , भिवापूर रस्ता , कुही ते बुटीबोरी रस्ता , अंभोरा पर्यटन स्थळ या प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्या संदर्भात लक्ष वेधले .

या कार्यक्रमाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी , नागपूर तसेच उमरेड जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, उमरेड भिवापूर , कुही येथील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषि मंडल विभाग की प्रेरणा से जन भागीदारी से कान्हादेवी ( टेकाडी) मे वनराई बधारा तयार किया.

Sun Nov 13 , 2022
पारशिवनी :- तालुका मे कृर्षी विभाग पारशिवनी विभाग और अंबुजा सीमेंट फाउंडेशन के संयुक्त रूप से पारशिवनी के कान्हादेवी गाव में जनभागीदारी के सहयोग कर बनराई बंधारा तयार किया गया। कान्हादेवी गांव के पूर्व सरपंच दुर्गा प्रसाद चौरीवार कृषि मंडल अधिकारी सूरज शेंडे,कृषि पर्यवेक्षक एम बावणे ,कृषि सहायक रविन्द्र सोरमारे , प्रक्षेत्र अधिकारी श्री सिद्धार्थ चांदेकर, दिनेश ताड़े द्वारा 11 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com