नागपूर :- वानाडोंगरी, नगर परिषदेचे बाजुला, हिंगणा रोड, एम.आय. डी.सी येथे राहणारे फिर्यादीचे वडील नामे लक्ष्मण किसन ढगे वय ५२ वर्ष हे सकाळी उठुन मॉर्निंग वॉकींग करीता गेले असता पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत मातोश्री कामनापूरे विद्यालय जवळ के.जी. एन चिकन सेंटर समोर, हिंगणा रोड येथे अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे वडीलांना धक्का मारून पळून गेला. अपघातामध्ये फिर्यादीचे वडील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी रवि लक्ष्मण हगे वय ३२ वर्ष यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे पोउपनि चांदकर यांनी अज्ञात आरोपी वाहन चालकाविरुद्ध कलम ३०४(अ) २७९. भा. दं. बो सहकलम १३४, १७७ मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.