माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई :- सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि अध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, फादर दिब्रिटो यांनी धर्मप्रांतात शांतता, बंधुभाव, एकात्मता यासाठी काम करताना पर्यावरण प्रेमाची हरित वसई चळवळ उभी केली. संत साहित्याचा गाढा अभ्यास आणि त्यातून एकोपा साधण्याचा त्यांचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मराठी साहित्यविषयक चळवळीत पर्यावरणप्रेमी भूमिका घेऊन केलेले लेखन हे त्यांचे आगळेपण आहे. ‘सुवार्ता’ या त्यांच्या नियतकालिकाने मराठी साहित्यात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे लेखन मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ठरले आहे. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा मान देखील मिळाला. त्यांच्या निधनामुळे अशा विविध क्षेत्रांना जोडणारा निखळ दुवा निखळला आहे. फादर दिब्रिटो यांना भावपूर्ण श्रद्धांजली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अनुयायांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री यांनी संदेशात नमूद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुसळधार पावसात अवैध हातभट्टी केंद्रावर कार्यवाही; २०.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Fri Jul 26 , 2024
मुंबई :- हातभट्टी व्यावसायिकांनी पावसाचा फायदा घेत ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव, शांतीनगर, सरलाबे, गोरपे गाव, कुंभार्ली गांव, भिवंडी तसेच ईतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी सुरू केल्या होत्या. मुसळधार पावसात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाच्या जवानांनी खाडीमधील हातभट्टी केंद्रांवर धाड़ी टाकून कार्यवाही केली. या कारवाईमध्ये एकूण २२ गुन्हे नोंद करण्यात आले असून बेवारस १३ गुन्हे नोदविले आहेत. या कारवाईमध्ये एकूण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com