संत गाडगेबाबा बाबा यांची जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- जिल्हा परिषद शाळा पिपरी – कन्हान येथे थोर समाजसेवक संत गाडगेबाबा बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

शुक्रवार (दि.२३) फेब्रुवारी ला जि प शाळा पिपरी-कन्हान येथे सामजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांचा हस्ते गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका ज्योती खरवडे यांनी गाडगे बाबा यांचा जीवन चिरित्र्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थांनी गाडगे बाबा यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक भारती हुमने, गेंदलाल बावनकुळे, सहायक आशा आबुलकर, शारदा बावणे सह विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक वाचनालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी

Sat Feb 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करून वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांची १४८ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. शुक्रवार (दि.२३) फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी ७ वाजता वैराग्यमुर्ती, थोर समाज सुधारक, स्वच्छतेची शिकवण कृतीतुन देणारे संत गाडगे बाबा यांची १४८ वी जयंती सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे प्रमुख अतिथी देवराव कावळे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com