संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करून वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांची १४८ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.
शुक्रवार (दि.२३) फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी ७ वाजता वैराग्यमुर्ती, थोर समाज सुधारक, स्वच्छतेची शिकवण कृतीतुन देणारे संत गाडगे बाबा यांची १४८ वी जयंती सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे प्रमुख अतिथी देवराव कावळे, सुभाष घोगले, प्रकाश नाईक यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार, पुष्प अर्पण करू न आदरांजली वाहीली. सर्व उपस्थित सभासद व वाचकानी पुष्प वाहुन आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी अतिथी महोदय तसेच सुभम शेंडे, अभिषेक निमजे यांनी अंधश्रध्दा निर्मुलनाचे जनक संत गाडगे बाबांच्या जिवना विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक व सुत्रसंचालन दिनकरराव मस्के हयानी तर आभार ग्रंथपाल श्याम बारई यानी मानले. शेवटी सर्व उपस्थिताना अल्पोहार व फळे वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली. कार्यक्रमास लिपीक कृणाल कोल्हे, अनिकेत दिवे, राहुल पारधी, रमन चव्हाण, उदय पाटील, आकाश गुप्ता, आशिष घोरपडे, सुजय गेडाम, मंथन ढोमणे, लोकेश बाविसाळे , कृष्णाली कोल्हे, जया ढोले, युवाली कोल्हे, हिमांशु हटवार, क्रिश मोहनकर, शौर्य सोनवाने, निरव कापसे, अखिलेश पाटील, वेंदात बुकणे सह सभासद व वाचक उपस्थित होते.