संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- वाढत्या घरफोडीवर अंकुश साधण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परिमंडळ क्र 5 च्या गुन्हे शाखा नागपूर चे घरफोडी विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे घोरपड ते शिरपुर रोड च्या मार्गावर लुबाडणूक, घरफोडी व दरोडा टाकण्याचा कट रचून बसलेल्या चार दरोडेखोर आरोपीना ताब्यात घेण्यात पोलिसांना गतरात्री साडे दहा वाजता यशप्राप्त झाले असून पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आरोपींचा दरोड्याचा प्रयत्न फासला.तर या धाडीतून पाच आरोपीवर भादवी कलम 399,402, सहकलम 4/25 भारतीय हत्यार कायदा च्या कलम 135 महाराष्ट् पोलीस कायदा अनव्ये गुन्हा नोंदविला असून पाच आरोपी पैकी रमाकांत नामक आरोपीने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले तर चार आरोपी अटक आहेत.
अटक चार आरोपीमध्ये आशिष उर्फ मनु कीशोर मनपिया वय 29 वर्षं रा कान्द्री कन्हान,रजत दिलीप नानेट वय 27 वर्षे ,कार्तिक राम नानेट वय 27 वर्षे दोन्ही राहणार जरीपटका नागपूर,अब्दुल ताज अब्दुल अजीज वय 36 वर्षे रा अब्दुल्लाह शाह दरगाह जवळ कामठी असे आहे.
या आरोपिकडून चार मोबाईल फोन,एक स्विफ्ट कार,लोखंडी प्राणघातक शस्त्र,मिरची पावडर,रस्सी असा एकूण 5 लक्ष 65 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेले पाचही आरोपी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातून सदर घटनास्थळी गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट कार मध्ये नमूद शस्त्र घेऊन बसले असता रात्रगस्ती वर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाड घालून दरोडे खोरांना कार व शस्त्र सह अटक करण्यात आले.