– (नागपूर महानगरपालिका आणि मिशन रेबिज ह्या रेबिज दूर करण्यासाठी समर्पित संस्था)  नागपूर :- शहरात १ सप्टेंबर २०२४ पासून २८ दिवस चालणा-या श्वानांच्या रेबिज लसीकरण मोहिमेची सुरूवात आज पासून होणार आहे. २८ दिवस चालणा-या या मोहिमेत नागपूर शहरातील २०,००० श्वानांना लसीकरण करण्याचे या संस्थांचे उद्दिष्ट आहे. एन.सी.आर.पी. च्या ‘Zero by 2030’ या मोठ्या ध्येया अंतर्गत शहरातील भटक्या श्वानांना मोफत रेबिज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येत्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर 30 ऑगस्ट रोजी कामठी-मौदा विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.या अंतिम मतदार यादीनुसार कामठी विधानसभा मतदार संघात समावेश असणाऱ्या कामठी-मौदा व नागपूर ग्रामीण या तीन तालुक्यातील एकूण मतदार संख्या ही 4 लक्ष 88 हजार 820 आहे यामध्ये 2 लक्ष 45 हजार 520 पुरुष तर 2 लक्ष 43 […]

– नागपूरमध्ये महिला वन कर्मचारी व अधिकारी परिषदेचे आयोजन चंद्रपूर :- राज्यामध्ये असलेल्या एकूण सर्व विभागांपैकी सर्वात मोठी जबादारी वन विभागावर आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत वन विभागाचे सर्वाधिक बजेट महाराष्ट्राचे आहे. वन संवर्धन, संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे, यामध्ये ‘आई’ प्रमाणे अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने काम करणाऱ्या महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो. आता प्रत्येक क्षेत्रात वन विभागाला नंबर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्म अनित्यांचे दैवत नबी यांच्या बद्दल जे वाईट उदगार काढले त्याचा निषेध करण्यासाठी काल कामठी येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे पूर्व महासचिव मो इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन वर शांतीपूर्ण मोर्चा नेत पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्याशी भेट घालून रामगिरी बाबा वर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निवेदित करण्यात आले.दरम्यान […]

नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत हाऊस नं. ६९, आंबेडकर नगर, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी निलेश मदनलाल हिरनवार वय ४३ वर्ष यांनी त्यांचे घरासमोर, रोडवर त्यांची स्कुटी पेप क. एम. एच ३१ ई. जे ६९२३ पार्क करून ठेवली असता अज्ञात आरोपीने फिर्यादीची गाडी जाळुन अंदाजे ७,०००/- रू चे नुकसान केले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे […]

नागपूर :- फिर्यादी सुधीर शत्रुघ्न निपोडे वय ३२ वर्ष रा. लॉट नं. ८०, महेश नगर, स्वामीनारायण मंदीर जवळ, वाठोडा, नागपूर हे त्यांचे मोटरसायकल क. एम. एच. ३१ बी.सी ९०२६ ने ईतवारी, मस्कासाथ येथुन गरी परत येत असता, संघर्षनगर चौकात त्यांना दोन २० ते २५ वर्ष वयाचे मुले अंधारात एका २० वर्षाच्या मुली सोवत बोलतांना दिसल्याने फिर्यादी यांनी त्या मुलांना हटकले […]

नागपूर :- गुन्हेशाखा पोलीसांना खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत सिएमपीडीआय रोड, हनुमान मंदीर मागे, ईटारसी पुलीया जवळ, जरीपटका येथे जुगार अड्डा सुरू आहे, अशा मिळालेल्या माहितीवरून नमुद ठिकाणी रेड कारवाई केली असता त्या ठिकाणी पैसे देवुन क्वाईन विकत घेवुन त्याचा वापर करून जुगार खेळणारे १) जयकुमार कोदुमल कंजवानी २) बंदु वासुमल रामनिवास ३) प्रकाश श्रावणजी कांबळे ४) […]

नागपूर :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आज नागपुरात शुभारंभ झाले. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने व नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रेशीमबाग येथील मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत ‘लाडक्या बहिणींनी’ उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात उपस्थित भगीनींसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आली होती. सुप्रसिद्ध गायीका वैशाली सावंत यांची बहारदार गाण्यांची […]

नागपूर :- अमर सेवा मंडळ द्वारा संचालित कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथील वरिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. वासुदेव बालाजी गुरनुले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी कमला नेहरू महाविद्यालयात अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ.  सुहासिनी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अमर सेवा मंडळाचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड.  अभिजित वंजारी […]

– पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’चा समारोप नागपूर :- विदर्भात पर्यटनाच्या दृष्टीने खूप क्षमता आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. ताडोबा, उमरेड, पेंचमुळे टायगर कॅपिटल म्हणून आपली ओळख आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना द्यायची असेल तर आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज […]

३७० कलम विरुद्ध देशभर दणदण दवंडी पिटली गेली. मात्र, काढतांना ते काढले गुपचूप ! या काढण्याला या ५ आगस्टला ५ वर्षे पूर्ण झाली. देशभर पंचवार्षिक जल्लोष करायचा. ते टाळले. प्रत्येक वेळी उर्वरित देशाचे (rest of India) राजकीय मतनिर्धारण (political opinion) समोर ठेवून दवंडी पिटायची. ती पिटली. लोकांनाही वाटायचे, ३७० काहीसे ‘भयंकर’ असेल ! प्रत्यक्षात ते काय होते ? काय घडले […]

जम्मू काश्मीर ची निवडणूक घोषित झालीय. टीचभर काश्मीर पुन्हा देशभर होईल. सोबत हरयाणा ची निवडणूक आहे. ती अनुल्लेखात जाईल. जम्मू काश्मीर मात्र चर्चेत असेल. हिंदू मुस्लिम तडका तिथे आहे. तडका पुन्हा खमंग होईल. मतदान तीन टप्प्यात आहे. १८, २५ सप्टेंबर व १ आक्टोबर. केवळ ९० जागांसाठी तीन दिवस मतदान कां याचे ठोस उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचे टाळले. तेव्हढ्याच ९० जागांची […]

– अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’ साजरा नागपूर :- लोकशाही यशस्वी होण्याची सुरवात ग्रामपंचायतीपासून होते. एकूणच आपल्या यंत्रणांची कामगिरी सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सल्लागाराची भूमिका योग्य निभवावी, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’, तसेच नागपूर केंद्राचा रौप्य महोत्सवी सोहळा आज राष्ट्रीय […]

– राज्यातील ITI मध्ये घेतला जाणार आत्मसंरक्षणाचा वर्ग मुंबई :- आता हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यातूनच हर घर दुर्गा […]

– योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड नागपूर :- रेशीमबाग मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला. या समारंभास बहिणींचा मिळालेला सहभाग हा केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

नवी दिल्ली :- देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेंट्रल विस्टा येथे महाराष्ट्राचा फूड स्टॉल कायमस्वरूपी उभारण्यात आलेला आहे. या स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते आज झाले. दिल्लीतील इंडिया गेट जवळ असलेल्या नॉर्थ फूड कोर्टमध्ये हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ देणारा स्टॉल सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलद्वारे दिल्लीला भेट देणाऱ्या पर्यटकांना […]

– पोलीस पाटील संघाच्या ८व्या अधिवेशनात ग्वाही – सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवू  नागपूर :- राज्यातील पोलीस पाटिलांच्या गेल्या ४ महिन्यांच्या मानधानाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देर्वेद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. तसेच पोलीस पाटिलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, […]

Ø नागपूर येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण Ø ५२ लाख भगिनींच्या खात्यात १५६५ कोटींच्या लाभाची रक्कम जमा Ø महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उत्कृष्ट कार्य –नितिन गडकरी Ø योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात परिवर्तन – देवेंद्र फडणवीस   Ø महिला कल्याणाच्या योजनांसाठी 75 हजार कोटी – अजित पवार नागपूर :- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य […]

– पर्यटन धोरण-२०२४ : अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्ह – 1 लाख कोटी गुंतवणूक व 18 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा नागपूर :- राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित […]

– संविधान जागर यात्रेचे नागपुरात जंगी स्वागत नागपूर :- संपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्याची क्षमता केवळ भारतीय संविधानात आहे. पण स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी वेळोवेळी संविधान धोक्यात असल्याची बतावणी करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचे पाप काँग्रेसी करतात. त्यांच्या या दांभिकपणावर संविधान जागर यात्रा जोरदार प्रहार ठरेल. संविधान जागर यात्रेचा विचार सर्वदूर पोहोचेल आणि जिंकेलही, असा विश्वास संविधान जागर समितीचे समन्वयक ॲड. धर्मपाल […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com